Money esakal
जळगाव

निराधार आजींच्या साडेनऊ लाखांवर डल्ला; संशयित भाडेकरू अटकेत

घर विकून या आजीबाईंनी ही रक्कम जमवली होती.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील हायवेदर्शन कॉलनीतील वृद्ध महिलेची नऊ लाख ६२ हजार १८१ रुपयांत ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या संशयिताला जळगाव सायबर पोलिसांनी अटक केली आहे. दीपक सुभाष अहिरे (रा. निभोंरा, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

जळगाव शहरातील हायवेदर्शन कॉलनीतील नलिनी राजाराम देसाई यांच्या पतीच्या निधनानंतर निराधार योजनेंतर्गत नलिनी यांना एक हजार रुपये पेंशन मिळायची. ही पेन्शन त्यांच्या बँक खात्यात जमा व्हायची. त्यांच्या घरात राहात असलेला भाडेकरू दीपक अहिरे हा नलिनी यांना बँकेच्या खात्यातून पैसे काढून देण्यासाठी मदत करायचा. काही दिवसांनंतर मधुमेह व रक्तदाबाचा त्रास होत असल्याने नलिनी देसाई यांनी त्यांचे घर विक्री केले. त्यातून मिळालेल्या पैशांचा धनादेश संबंधिताने नलिनी यांच्या बँक खात्यावर जमा केला होता. घर विकल्यानंतर नलिनी त्यांच्या शिरपूर येथील बहिणीकडे स्थलांतरित झाल्या. गुरुवारी (ता. ९ जून) नलिनी नेहमीप्रमाणे बँकेत पेंशन काढण्यात आल्या असता, त्यांना त्यांच्या घराच्या विक्रीतून मिळालेले नऊ लाख ५० हजार रुपये खात्यावर दिसून आले नाही. बँकेत विचारणा केल्यावर कुणीतरी अनोळखी व्यक्तीने २० जानेवारी ते २० मे २०२२ दरम्यान वेळोवेळी यूपीआयद्वारे ऑनलाइन पैसे काढून घेतल्याचे लक्षात आले. याबाबत नलिनी देसाई यांनी जळगाव सायबर पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरुन ९ जूनला गुन्हा दाखल झाला होता.

तांत्रिक माहितीवरून अटक
या गुन्ह्यात नलिनी यांच्या बँकेच्या संलग्नित मोबाईल क्रमांकांचे कॉल डिटेल्स, बँक खात्याची माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर तपासण्यात आल्यावर निंभोरा येथील दीपक अहिरे या तरुणाने हा प्रताप केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या पथकातील दिलीप चिंचोले, दीप्ती अनफाट, गौरव पाटील, दीपक सोनवणे व श्रीकांत चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. २४) दीपक सुभाष अहिरे यास अटक केली. त्याने वृद्ध महिलेचे सीमकार्ड जुने झाल्याचा बहाणा करत ते स्वतःजवळ ठेवले. तसेच त्यावरून यूपीआय आयडीद्वारे नलिनी यांच्या बँक खात्यावरून एकूण नऊ लाख ६२ हजार १८१ रुपये काढून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. संशयितास जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : प्रोटोकॉल मुद्द्यावर उपमहापौर संजय घाडी नाराज; पदाचा सन्मान राखण्याची प्रशासनाला करून दिली आठवण

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

SCROLL FOR NEXT