ATM robbery  esakal
जळगाव

ATM फोडून साडेनऊ लाख लंपास; सुरक्षा रक्षक नसल्याने साधला डाव

या ATMच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमलेला नसल्याने चोरट्यांनी त्यांचा डाव साधला.

सकाळ वृत्तसेवा

कासोदा (ता. एरंडोल) : येथील युनियन बँकेचे ‘एटीएम’ मशिन गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील ९ लाख ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. या ‘एटीएम’च्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमलेला नसल्याने चोरट्यांनी त्यांचा डाव साधला.

येथील गजबजलेल्या बस स्थानक परिसरातील बिर्ला चौकात काही वर्षांपासून युनियन बँकेचे ‘एटीएम’ मशिन आहे. त्याच्या सुरक्षेसाठी एकही सुरक्षा रक्षक नियुक्त केलेला नाही. काल (ता. ३१) च्या मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी वाहनातून काही चोरटे आले व त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने चक्क ‘एटीएम’ कापून त्यातील ९ लाख ५५ हजार रुपये चोरून पोबारा केला. ही चोरी झाल्याचे आज पहाटे लक्षात येताच, पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पाचोरा उपविभागीय पोलीस उपअधीक्षक श्री. काकडे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बकाळे व सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. चोरांचा माग काढण्यासाठी ‘जंजीर’ श्‍वानाला पाचारण करण्यात आले होते. गॅस कटरचा वापर केल्यामुळे श्‍वानाला चोरट्यांचा कोणताही मार्ग दाखवता आला नाही. दरम्यान, ठसे तज्ज्ञांनी नमुने घेतले आहेत.

नोटा जळाल्याचा अंदाज

‘एटीएम’ कापण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आल्याने ज्या ठिकाणी चोरट्यांनी कटरचा वापर केला होता, तेथे दोन हजाराची एक नोट जळालेल्या अवस्थेत मिळून आली. त्यामुळे आगीची झळ पोचून आणखीन काही नोटा जळाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांची रात्रभर गावात गस्त सुरु असताना मोक्याच्या ठिकाणी चोरीची ही मोठी घटना घडल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. या ठिकाणी किमान तरी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करणे गरजेचे असताना कोणीही नसल्याने ही चोरी झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यापूर्वी देखील लहानमोठ्या अनेक चोऱ्या झाल्या असून त्यांचा अद्यापही तपास लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांबद्दलही ग्रामस्थांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे. याबाबत दीपक तिवारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Maharashtra Rain : डीप डिप्रेशन वादळी स्थिती; अल् निनोला भेदून महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Student Protest: विद्यार्थी, शेतकरी आंदोलनाची तयारी; ‘सीजेपी’ आणि संयुक्त किसान मोर्चा सरकारविरुद्ध आक्रमक

ब्रेकिंग! मोहोळ तालुक्यातील चिंचोळी ‘एमआयडीसी’त बनावट दारूची फॅक्टरी; कारवाई संपायला लागले १२ तास; ‘एक्साईज’च्या अधीक्षक म्हणाल्या, १५ वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई

Commonwealth Games 2026: नाशिकच्या दिलीप गावितला 'सुवर्ण'; Goosebumps आणणारा Video! २ रौप्यपदकांसह भारताने सहाव्या दिवशी पक्की केली ६ पदकं

WHO IS DILIP GAVIT? ५ वर्षांचा असताना झाडावरून पडला अन् हात गमावला... शेतमजूराच्या पोरानं राष्ट्रकुल स्पर्धेत 'सुवर्ण'अध्याय लिहिला; संघर्षमय कहाणी

SCROLL FOR NEXT