jalgaon municipal corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : महापालिकेचे 981 कोटी 47 लाखाचे अंदाजपत्रक सादर

महापालिकेत लोकनियुक्त पदाधिकारी नसल्याने प्रशासनातर्फे सन २०२४-२५ चे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : महापालिकेचे २०२४-२५ चे वार्षिक ९८१ कोटी ४७ लाख २९ हजाराचे अंदाजपत्रक मुख्यलेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांनी स्थायी समितीत आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्याकडे सादर केले. पुढील आठवड्यात महासभेत आयुक्त दुरुस्तीसह सादर करतील. कोणतीही करवाढ नसल्याने जळगावकरांना हा दिलासा आहे.

महापालिकेत लोकनियुक्त पदाधिकारी नसल्याने प्रशासनातर्फे सन २०२४-२५ चे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. (981 Crore 47 Lakh Budget of jalgaon Municipal Corporation submit news)

आज झालेल्या स्थायी समिती सभेत मुख्यलेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांनी ते आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्याकडे सूपूर्द केले. आयुक्तांनी स्थायी समिती सभेत त्यांची माहिती दिली. ९८१ कोटी ४७ लाख २९ हजाराच्या अंदाजपत्रकात सद्यस्थितीत कोणतीही करवाढ सूचविण्यात आलेली नाही.

मालमत्ता करातून ६९ कोटी २८ लाख

महापालिकेतर्फे उत्पन्नाचा मूळ स्रोत मालमत्ता कर असून या करातून तब्बल ६९ कोटी २८ लाखाचे उत्पन्न अपेक्षीत धरले आहे.यात घरपट्टीसह इतर मिळकत करातून ६४ कोटी ५६ लाख तर खुला भुखंडातून ४ कोटी ७१ लाख ३४हजार उत्पन्न अपेक्षीत धरण्यात आले आहे.

यात शासकीय तसेच पाणी पुरवठा कर वेगळे आहेत. महापालिकेच्या मिळकतीपासून ९० कोटी ५० लाखाचे उत्पन्न अपेक्षीत आहेत.यात महापालिकेचे व्यापारी संकुलातील गाळेही आहेत. शासन अनुदानित योजनेतून ३०१ कोटी ४२ लाखाचे उत्पन्न अपेक्षीत आहे.

दीक्षाभूमी भूसंपादनासाठी दहा कोटी

महापालिकेतर्फे शहरात दीक्षा भूमी उभारण्यात येणार आहे. महासभेत त्यांची ग्वाही तत्कालीन महापौर जयश्री महाजन यांनी दिली होती.

त्या दीक्षाभूमीच्या भूसंपादनासाठी दहा कोटीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय इतर खर्चाचेही नियोजन करण्यात आले आहे.

पुढील आठवड्यात अंतिम अंदाजपत्रक

महापालिकेचे अंदाजपत्रक आज मुख्यलेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांनी स्थायी समितीत आयुक्ताकडे सादर केले आहे. आयुक्त डॉ.विद्या गायकवाड काही दुरुस्तीसह अंतिम अंदाजपत्रक पुढील आठवड्यात महासभेत सादर करतील.

- रस्त्यासाठी १५ कोटी ५० लाख

- गटारीसाठी ६ कोटी १५ लाख

- शौचालय, प्रसाधनगृहासाठी ६० लाख

- पुतळ्यासाठी दोन कोटी,

- वाहन खरेदीसाठी दोन कोटी,

- बोगदा, उड्डाणपुलासाठी ५० लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT