Death news  esakal
जळगाव

Jalgaon News : नववीच्या विद्यार्थ्याचा धरणात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पहूर : बैलांना पाणी पाजण्यासाठी धरणावर गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. २) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. येथील आर. टी. लेले हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी रामेश्वर राजू सोनवणे वडीलांना मदत व्हावी, म्हणून खळ्यातील बैल पाणी पाजण्यासाठी पॉवर हाउसच्या बाजूलाच असलेल्या देवळी धरणावर बैलगाडी घेऊन गेला.

त्याने बैल धुण्यासाठी आणि त्यांना पाणी पाजण्यासाठी शर्ट आणि पॅन्ट काढून बैलगाडीवर ठेवली व बैल घेऊन पाण्यात गेला.

मात्र, तो परत आलाच नाही. एकच बैल घरी परत आल्याने सारेच आश्चर्यचकित झाले. बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेला रामेश्वर घरी न आल्याने घरच्यांना चिंता वाटली. धरणावर जाऊन पाहिले असता, बैलगाडीवर रामेश्वरचे कपडे निदर्शनास आले. (A Ninth grader Death by drowning in a dam Jalgaon News)

हेही वाचा :'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

त्यामुळे धरण परिसरात त्याचा शोध घेतला असता, पाण्याच्या तळाशी त्याचा मृतदेह आढळून आला. तशाच अवस्थेत त्याला पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. तडवी यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

रामेश्वरचा मृतदेह पाहून आईने एकच हंबरडा फोडला. त्याच्या मागे आई-वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. या घटनेने पहूर परिसरावर शोककळा पसरली आहे. याबाबत राजू तुकाराम सोनवणे यांनी दिलेल्या माहितीवरून पहूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस कर्मचारी भरत लिंगायत तपास करीत आहे.

मुख्याध्यापकांची हळहळ

आर. टी. लेले हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात येऊन पालकांचे सांत्वन केले. रामेश्वरच्या

मृत्यूबाबत शिक्षण विस्ताराधिकारी विजय सरोदे व वर्गशिक्षक गोपाल थोरात यांनीही शोक भावना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT