Institute of Technology University Vice Chancellor Prof. Dr. Aniruddha Pandit By the hands of phd degree to Manoj Pawar. esakal
जळगाव

Jalgaon News : रिक्षाचालकाच्या मुलाने मिळविली ‘पीएच.डी.’

माहेजी येथील सर्वसामान्य कुटुंबातील मनोज पवार याची ही यशोगाथा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांद्रा : वडिलांचे शिक्षण जेमतेम तिसरी...घरची परिस्थिती बेताची.. थोडीशी शेती व वडिलांचा रिक्षा व्यवसाय..यातूनच दोन मुलांचे शिक्षण एकास सोयगाव येथे एस.टी महामंडळाची नोकरी मिळाली तर लहान मुलगा मनोज पवार याने ‘फार्मसी’ करून ‘मास्टर डिग्री’साठी प्रयत्नरत असताना इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी मांटुगा (मुंबई) विद्यापीठाततून फार्मास्युटिकल विषयात ‘डाॅक्टर ऑफ फिलाॅसाॅफी’ (पीएच.डी.) पदवी घेतली.

माहेजी येथील सर्वसामान्य कुटुंबातील मनोज पवार याची ही यशोगाथा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. (A rickshaw pullers son earned Phd degree jalgaon news)

माहेजी येथील रिक्षा व्यवसाय करणारे अशोक पवार (भावडू पवार) यांचा लहान मुलगा मनोज अशोक पवार याला माटुंगा (मंबई) येथे झालेल्या तेराव्या दीक्षांत समारंभात रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या माध्यमातून फार्मास्युटिकल या विषयात डाॅक्टर ऑफ फिलाॅसाॅफी (पीएच.डी.) पदवी कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

या पीएच.डी. पदवीसाठी प्रा. प्रदीप वाविया यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मनोज हा लहानपणापासून अत्यंत हुशार असल्यामुळे आईचे व वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि चिकाटीनने शिक्षण पूर्ण करीत राहिला.

वडिलही आपल्या जेमतेम उत्पनातून मुलगा हुशार असल्यामुळे पैशासाठी कधीच कमी पडले नाही. माहेजी गावातून पहिला पीएचडी पदवी घेणारा विद्यार्थी मनोज पवार ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT