crime news esakal
जळगाव

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; पोलिसात गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून ती गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून ती गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले. तब्बल साडे सहा महिने शारीरिक संबंध ठेवत तिच्यावर अत्याचार केला. यातून ती मुलगी गर्भवती झाल्याचे गंभीर प्रकार २१ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीला आला आहे. भगवान उर्फ (भगा) कैलास सोनवणे (रा. चांभार्डी बु. (मजरे) ता. चाळीसगाव जि. जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात भादवी कलम- ३७६ (२) (एन), ३६३, ३६६ (ए), पोस्को अंतर्गत ४, ६, ८, १२ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

Theatre and Memories : नाटक संपतं, पण वस्तूंच्या आठवणी राहतात; ‘बेगम बर्वे’पासून ‘गोदो’पर्यंतचा रंगानुभव

SCROLL FOR NEXT