Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; Posco कायद्यानुसार गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत दोन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तालुक्यातील निंभोरा येथील तरुणावर ‘पॉस्को’ कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. अल्पवयीन मुलीला संशयितापासून मुलगा झाला असून, तिने मुलाचा परित्याग करून बाळाला महिला बालकल्याण समितीच्या ताब्यात दिले आहे.

निंभोरा येथील संशयित समाधान गुलाब पारधी याने २०२० मध्ये अल्पवयीन मुलगी नववीत असताना ‘तू मला आवडते. आपण दोघे पळून जाऊन लग्न करू, असे सांगत होता. त्या वेळी मुलीने नकार दिल्याने तरुणाने तिच्या आई- वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला.(Abusing a minor Girl Case has been filed under Pocso Act Jalgaon Crime News)

आई-वडील शेतात आणि बहिणी शाळेत गेल्यावर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मुलीच्या आई-वडिलांना समजल्यावर त्यांनी तिचा साखरपुडा करून दिला. ती १८ वर्षाची असताना लग्न करण्यात येणार होते.

मात्र, ९ नोव्हेंबरला मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला तपासले असता डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगून सात महिन्यांची गर्भवती असतानाच प्रसूती केली. त्यानंतर पीडित मुलीला धुळे जिल्हा महिला बालकल्याण समितीकडे पाठविण्यात आले. पीडित मुलीने जन्माला आलेल्या बाळाचा परित्याग करून समितीच्या अश्विनी देसले यांच्या ताब्यात दिले. मारवड पोलिसांनी समाधान पारधी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

SCROLL FOR NEXT