जळगाव

जळगाव एस. टी स्टॅण्डमध्ये दुर्घटना; बस खाली आल्याने वृध्देचा मृत्यू

भूषण श्रीखंडे

जळगाव ः जळगाव शहरातील एस. टी स्टॅण्ड मध्ये आज सकाळी बसच्या चाका खाली येवून वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे एस. टी स्टॅण्डवर एकच धावपळ उडाली. 

जळगाव शहरातील नविन एस. टी स्टॅण्ड मध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास एमएच १४, बीटी, ५६४ या क्रमांकाची मनमाड- भुसावळ ही बस आली. बस जागेवर लावण्यासाठी बस चालक गाडी चालवित असतांना देवकाबाई नाराणय सपकाळे (वय ६०) या बसच्या पुढच्या चाकाखाली आल्या. देवकाबाई यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडतात बस स्थानकात एकच धावपळ उडाली. 

पोलिस घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी बस स्थानकात धाव घेतली. पोलिस निरीक्षक विलास शेंडे हे घटनास्थळी येवून त्यांनी पाहणी केली तसेच पंचनामा करून पोलिस स्टेशनमध्ये जबाब नोंदणीचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Cancer Symptoms : खळबळजनक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तब्बल १४ हजारांहून अधिक महिलांमध्ये आढळली 'कॅन्सर'सारखी लक्षणे

कपिल शर्माही खलिस्तानींच्या निशाण्यावर; दोन दिवसांपूर्वी उघडलेल्या कॅफेवर गोळीबार, 'या' संघटनेने घेतली जबाबदारी

Latest Maharashtra News Updates : नाशिकच्या गोदावरी नदीत एक जण गेला वाहून

Video: आई शप्पथsssss असं रिपोर्टिंग तुम्ही पाहिलं नसेल! गुरुग्राममध्ये पावसाचा कहर, त्यात या पठ्ठ्याला आली लहर मग...

Thane News: सफाई कर्मचाऱ्यांना नवी ओळख देण्याचा निर्धार, गणवेश बदलण्याचा निर्णय, पालिकेची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT