(SSY)  esakal
जळगाव

Sukanya Samriddhi Yojana : सुकन्‍या योजनेत जळगावच्‍या तब्बल 93 हजार मुलींचे खाते!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी अल्प बचतीला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारने टपाल खात्यांतर्गत ‘सुकन्या समृद्धी’ ही विशेष गुंतवणूक योजना सुरू केली आहे. या योजनेला प्रतिसाद चांगला मिळत आहे. पोस्‍टाच्‍या जळगाव व भुसावळ विभाग मिळून आतापर्यंत ९३ हजार २९० मुलींच्‍या नावे सुकन्‍या खाते उघडण्यात आली आहेत.(Account of 93 thousand girls in Sukanya Yojana appeal for participation of mahalogin drive Jalgaon news)

भारतीय डाक विभागाने सामाजिक बांधिलकी म्हणून नवीन योजना व तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. विशेष म्हणजे, मागे पडत असलेल्या टपाल कार्यालयाच्या सेवा सर्वसामान्य व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मासिक पाच हजार गुंतवा, मिळवा २५ लाख

सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर ७.६ टक्के व्याजदर निश्चित केला आहे. या योजनेत वर्षाला जास्तीत जास्त १.५० लाख रुपये, तर किमान २५० रुपये जमा करता येतात. सध्‍या सुरू असलेला व्‍याजदर कायम राहिल्यास आणि १४ वर्षांसाठी दरमहा पाच हजार रुपये किंवा वार्षिक ६० हजार रुपये गुंतविले, तर १५ वर्षांसाठी ६० हजारांच्या वार्षिक गुंतवणुकीवर एकूण योगदान नऊ लाख रुपये असेल.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

नंतर पुढील सहा वर्षांसाठी त्या रकमेवरील परतावा वार्षिक ७.६ टक्के चक्रवाढ होईल. २१ वर्षांच्या म्हणजेच मॅच्युरिटीवर ही रक्कम सुमारे २५ लाख ४६ हजार ६२ रुपये असेल. जळगाव जिल्‍ह्यात पोस्‍टाच्‍या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जळगाव विभागातून ४८ हजार ९५० व भुसावळ विभागातून ४४ हजार ३४० खाते सुरू झाले आहेत.

महालॉगिन सहभागी होण्याचे आवाहन

सुकन्‍या समृद्धी योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असला, तरीही अनेक मुलींची खाते उघडणे अद्याप बाकी आहे. यामुळे सुकन्‍या खाते ओपन करण्यासाठी पोस्‍ट खात्‍यातर्फे ९ व १० फेब्रुवारीला महालॉगिन ड्राईव्‍ह केला जाणार आहे.

ज्‍या मुलींची खाते उघडणे बाकी आहे त्‍यांच्‍या पालकांनी महालॉगिनमध्‍ये सहभागी व्हावे, असे आवाहन डाक अधीक्षक बी. व्‍ही. चव्‍हाण यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT