accused who abused minor girl was sentenced in the court within 60 days  court hammer
जळगाव

चिमुरडीस खाऊचे आमीष देत अत्याचार; नरधामास ६० दिवसात झाली शिक्षा

सकाळ डिजिटल टीम


जळगाव : बिस्कीट पुड्याचे आमीष देत चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नरधामाविरूद्ध अवघ्या सतरा दिवसात तपास पूर्ण करण्यात येऊन दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फास्ट ट्रॅक कोर्ट प्रमाणे खटल्याचे कामकाज ६० दिवसात पूर्ण होत न्या. एस. एन. माने- गाडेकर यांनी आरोपी सावळाराम भानुदास शिंदे (वय २७) यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच पीडितेला मनोधैर्य योजनेंतर्गत तीन लाख, दंडाची निम्मी रक्कम, विक्टिम कॅम्पेनसेशन फंड अंतर्गत दहा लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश दिलेत.

चाळीसगाव तालुक्यातील चार वर्षीय चिमुरडीला (ता.२७ नोव्हेंबर २०२१) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सावळाराम भानुदास शिंदे (वय-२७ वर्ष रा. मानसिंगका कॉलनी, पाचोरा, मुळ गाव लढरे ता. नांदगाव जि.नाशिक) याने बिस्कीटचा पुडा खायला देतो असे सांगुन उचलून नेत अत्याचार केला होता. पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

चाळीसगाव पेालिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल टकले यांनी प्राथमिक तपासाला सुरवात केली पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावंडे यांनी पूर्ण केला. तपासात संशयीतासह पिडीतेचे अंगावरील कपडे, रक्ताचे नमुने, डीएनऐ तसेच शरीरावरील ओरखडे, आदींसह विवीध पुरावे संकलीत करुन त्यांचे शासकिय प्रयोग शाळेतून पृथक्करण अहवाल प्राप्त करुन अवघ्या १७ दिवसात देाषारोप पत्र न्यायालयात सादर केले. खटल्याचे कामकाज विशेष न्यायालयात न्या. श्रीमती एस. एन. माने-गाडेकर यांच्या न्यायालयात सुरू होते.

खटला फास्ट ट्रॅक

विशेष न्यायालयाने हा खटला जलदगतीने चालवून साठ दिवसात सुनावणी पूर्ण करून आज (ता.१६) निकाल दिला. न्यायालयाने आरोपी सावळाराम शिंदे यास आजन्म कारावास व दोन लाख आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली.

न्यायासाठी झटणाऱ्यांचा सन्मान

गुन्हयाचा तपास पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी कैलास गावडे, सहायक निरीक्षक विशाल टकले, पोलिस नाईक राकेश पाटील, राहुल सोनवणे, विमल सानप, सबा शेख या पथकाने पूर्ण केला. खटल्याचे कामकाजात निरीक्षक के. के. पाटील यांच्या पथकातील दिलीप सत्रे यांच्यासह जिल्‍हा सरकारी अभियोक्ता ॲड. केतन ढाके अशांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सत्कार करून अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT