Jalgaon District Collector Ayush Prasad  esakal
जळगाव

Jalgaon News : महसूल पथकाच्या पाळतीवर असणाऱ्यावर कारवाई : प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकावर पाळत ठेवणाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे.

तसेच पुढील काळात अशा पाळत ठेवणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. (Action against those under surveillance of revenue team jalgaon news)

जळगाव जिल्ह्यात वाळू ठेक्यांची लिलाव प्रक्रिया प्रस्तावित आहे. अशात जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हा प्रशासनाने कारवाईचे अस्त्र उगारले आहे. जिल्ह्यात २ रोजी विविध ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांचे पथक कारवाईसाठी पाठविण्यात आले होते.

कारवाईसाठी गेलेल्या पथकांच्या वाहनांमागे त्यांच्यावर पाळत ठेवणारे आढळून आले. या पाळत ठेवणाऱ्यांची चार मोटारसायकल प्रशासनाकडून जप्त करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांच्या वाहनामागे पाळत ठेवणाऱ्यांची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे.

वाळूच्या कारवाईसाठी गेलेल्या पथकावर पाळत ठेवणाऱ्यां‍विषयी जिल्हाधिकारी प्रसाद आणि पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यात चर्चा झाली. पथकावर पाळत ठेऊन असणाऱ्यांची मोक्याची ठिकाणे आणि त्यांची माहिती याविषयी सखोल चौकशी केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest Updates: नेपाळमध्ये हिंसाचाराचा भडका ! भारताने विमान, रेल्वे सेवा केली स्थगित, नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

Ballari Jail : 'या' अभिनेत्याने रडत रडत न्यायाधीशांकडे कारागृहात केली विष देण्याची विनंती; असं काय घडलं त्याच्यासोबत?

Latest Marathi News Updates : आज मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Chhagan Bhujbal : ‘कुणबी’चा आदेश मागे घ्यावा; ओबीसींच्या हक्कांवर गदा आणू नका

मोहोळ तालुका हादरला! गलंदवाडी येथील दांपत्यास कोयत्याने मारहाण करून दरोडा; दोघेजण जखमी, जीवे मारण्याची धमकी अन्..

SCROLL FOR NEXT