Commissioner Vidya Gaikwad while reviewing the action taken on unauthorized billboards in the city on Monday in the municipal hall  esakal
जळगाव

Jalgaon News : अनधिकृत फलकांविरोधात धडक कारवाई; या तारखेपासून शहरात मोहीम राबविणार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील विविध मार्गालगत, चौकांमध्ये, तसेच सार्वजनिक ठिकाणी हजारोंच्या संख्येने अनधिकृत फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून, मनपाला उत्पन्नही मिळत नाही. (action against unauthorized boards by municipal corporation from 26 april jalgaon news)

त्या पार्श्वभूमीवर हे सर्व फलक काढण्याची मोहीम तातडीने हाती घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिल्या.

अनधिकृत फलकांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आज डॉ. गायकवाड यांनी यासंदर्भात आढावा घेतला. जळगाव शहरामध्ये बऱ्याचशा नागरिकांनी, व्यावसायिकांनी जाहिरातीचे फलक (होर्डिंग्ज) विनापरवानगी लावल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तसेच काही जाहिरात फलकधारकांनी मनपाची होर्डिंग लावण्या संदर्भात परवानगी घेतलेली आहे; परंतु जाहिरात फलक/ होर्डिंग लावण्याची प्रत्यक्ष मागणी मंजूर संख्या व प्रत्यक्ष मागणी मंजूर संख्येपेक्षा जास्त जाहिरात फलक लावल्याचे आढळून आल्यास अशा जाहिरात फलकधारकांचे फलक जप्तीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

बुधवारपासून कारवाई

अनधिकृत फलक बुधवार (ता. २६)पासून काढले जातील. तसेच महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५ नुसार कारवाई केली जाणार आहे. संबंधित जाहिरात फलक लावणारे नागरिक व व्यावसायिकांनी कारवाईआधीच हे फलक काढून घ्यावेत, असा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st Test: टीम इंडियाकडून अडीच दिवसात वेस्ट इंडिजचा करेक्ट कार्यक्रम! मायदेशात विजयपथावर परतला आपला संघ

Shakti Cyclone : 'शक्ती' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला किती धोका? IMDचे अपडेट आले समोर

Latest Marathi News Live Update : आदिवासी आक्रमक- पोलिस स्टेशनवर दगडफेक

Gautami Patil Accident : अपघात गौतमी पाटीलच्या वाहनाचा, अन् भांडण रोहित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात; दादांनी थेट आरे तुरेच्या भाषेत सुनावलं...

Sharad Pawar : पूरग्रस्तांसाठीच्या नुकसानभरपाईचे धोरण सरकारने लवकर जाहीर करावे; शरद पवार यांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT