Action under MPDA act against woman selling liquor jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : दारुविक्रेत्या महिलेच्या विरोधात ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील ग्रामीण पोलिसांनी वारंवार सांगून प्रसंगी कारवाया करुनही गावठी दारुची विक्री सुरुच ठेवणाऱ्या सांगवी (ता. चाळीसगाव) येथील दारु विक्री करणाऱ्या महिलेच्या विरोधात ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई केली आहे.

महिलेच्या विरोधातील ‘एमपीडीए’ अंतर्गत ही तालुक्यातील पहिली कारवाई आहे. याबाबत माहिती अशी, ग्रामीण भागात खुलेआम विकल्या जाणाऱ्या गावठी दारुमुळे अनेक कुटुंबीय उद्ध्वस्त झाली आहेत. (Action under MPDA act against woman selling liquor jalgaon crime news)

सांगवी (ता. चाळीसगाव) येथील आक्काबाई सुरेश चव्हाण (वय ४०) ही महिला देखील गावठी दारुची विक्री करते. तिच्या विरोधात यापूर्वी हातभट्टीची दारु विक्री प्रकरणी बरेच गुन्हे दाखल आहेत.

महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत आठ गुन्हे दाखल असून तीन वेळा प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. तिच्या विरोधात वारंवार कारवाया होऊनही तिच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने ग्रामीण पोलिसांनी तिच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता.

त्यानुसार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार, आक्काबाई चव्हाण हिची शनिवारी (ता. २१) अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक ‌अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, उप निरीक्षक कुणाल चव्हाण, लोकेश पवार, राजेंद्र साळुंखे, शांताराम पवार, भूपेश वंजारी, नंदलाल परदेशी, संदीप पाटील, गोवर्धन बोरसे, शंकर जंजाळे, संदीप माने, मनोज पाटील, राहुल जाधव, भारती बच्छाव यांनी केली.

या कारवाईमुळे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. गावठी दारुची विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशाच कारवाया केल्या जातील असा इशारा पोलिस निरीक्षक श्री. जाधव यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT