Action under MPDA against Atish Kharat in Bhusawal jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime : भुसावळातील आतिष खरातवर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : भुसावळ शहर आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आतिष रवींद्र खरात (वय २७, रा. समतानगर, भुसावळ) याच्यावर ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

त्याची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी (ता. २५) काढले. (Action under MPDA against Atish Kharat in Bhusawal jalgaon crime news)

अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणे, अत्यावश्यक लागणाऱ्या वस्तूंचा काळाबाजार, बेकायदेशीर हत्यार घेऊन परिसरात दहशत माजविणे, गावठी दारूची विक्री केल्याप्रकरणी गुन्हेगार आतिष रवींद्र खरात याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात तीन, तर भुसावळ शहर पोलिस ठाण्यात चार असे सात गुन्हे दाखल आहेत.

भुसावळ शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांनी ‘धोकादायक व्यक्ती’ या संज्ञेचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेला सादर केला होता.

त्यानुसार हा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आला. त्यांनी ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत आतिष खरात याला एक वर्षासाठी पुण्यातील येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्याच्या आदेशाला मंजुरी दिली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार पोलिसांनी खरात याला अटक करून त्याला येरवडा कारागृहात रवाना केले.

हा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांनी तयार केला.

यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किसन नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोलिस कर्मचारी सुनील दामोदरे, जयंत चौधरी, पंडित पाटील यांनी सहकार्य केले. खरात याला भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, नीलेश गायकवाड, पोलिस कर्मचारी अनिल चौधरी, संजय पाटील, संदेश निकम, सोपान पाटील, भूषण चौधरी, दीपक शेवरे, योगेश घुगे यांनी अटक करून स्थानबद्ध केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT