Madhuri Fadke  esakal
जळगाव

jalgaon : कर्करोगावर मात करून ‘ती’ रमली समाजकार्यात

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ‘कर्करोग’ म्हटला, की सर्वांच्या छातीत धडकी भरते. आपले आता कसे होणार? आपले आता काही खरे नाही. मात्र कर्करोग असल्याचे समजताच सकारात्मक विचारसरणीने येथील माधुरी मधुकर फडके (वय ८१) यांनी त्या रोगावर मात केली. दोन महिन्यांपूर्वी त्यांची ॲन्जिओप्लास्टी झाली. त्यातून बाहेर पडून लगेच समाजकार्याला लागल्या. या वयातही तरुणांना लाजवेल असा उत्साह प्रत्येक कार्यात असतो, याज्ञिकीची आवड असून, आशादीप वसतिगृहातील मुलींची लग्नेसुद्धा लावली आहेत.

सौ. फडके यांचे शिक्षण एम.ए.,बी.एड. झालेले असून, हायस्कूल शिक्षिका होत्या. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना प्रबळ असल्याने सामाजिक कार्य करण्यात नेहमीच सहभाग असतो. दोन वेळा मोफत गीता वर्ग घेऊन बऱ्याच भगिनींना गीतेची संथा (संबंधिताकडून वदवून घेणे) दिली आणि अर्थासहित निरूपण केले. कोरोनापूर्वी बराच काळ प्रत्येक एकादशीला श्री विष्णुसहस्रनामाचीही संथा दिली. (After overcoming cancer Madhuri Phadke active in social work jalgaon inspirational story news)

सुरभी महिला मंडळात सुरवातीलाच बऱ्याचशा मैत्रिणींना श्रीसूक्त आणि श्री गणपती अथर्वशीर्षाची संथा दिली. ते शुद्ध म्हणण्याचा आग्रह धरला. दर वेळेस श्रीसूक्त ग्रुपमध्ये सहभाग असतोच. मंडळाच्या वर्धापन दिनाच्या वेळी महापालिकेच्या रुग्णालयात, औरंगाबादच्या साकार अनाथाश्रमात बालकांना झबली, दुपटी वाटप करतात, लहान बाळांसाठी स्वेटर स्वतः विणून देतात. राष्ट्रसेविका समितीच्या कार्यातही सक्रिय सहभाग असतो.

समितीमध्ये सह बौद्धिकप्रमुख म्हणून काम केले. भगिनी मंडळाचे नऊ वर्षे अध्यक्षा म्हणून काम पाहिले. सध्या त्या सुरभी मंडळाच्या कार्यकारिणीत सदस्या म्हणून कार्यरत आहेत. दोन वर्षे मंडळाच्या अध्यक्षा होत्या. त्याचप्रमाणे दोन वर्षे कोशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत्या. सर्व पदाधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य असते. संस्कृत विषयाचा अभ्यास असल्यामुळे संस्कृतविषयी स्तोत्रांचे मार्गदर्शन करीत असतात.

संकटाला घाबरू नका, तोंड द्या

८१ व्या वर्षातही त्यांच्या युवकांसारख्या उत्साहाचे गुपित काय आहे, असे विचारल्यावर त्या म्हणतात, आजकाल केव्हा कोणते संकट येईल हे सांगता येत नाही. यामुळे प्रत्येकाने मनाला खंबीर करून येणाऱ्या संकटाला धीराने तोंड दिले पाहिजे. मला कॅन्सर झाला, ॲन्जिओप्लास्टी झाली तेव्हा मी घाबरले नाही, आपण यातून तरून जाऊ, मन खंबीर केले. यामुळे दोन्ही व्याधींतून सहीसलामत बाहेर पडल्याचे त्या सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT