Suresh Kaivare esakal
जळगाव

Jalgaon Crime News : एक वर्षाची शिक्षा भोगूनही शेवटी ‘चोर तो चोरच!’

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरासह विविध मंदिरातील साहित्य चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सुरेश बबनराव केवारे (वय ६५, मुळ रा. खामगाव, ह.मु जळगाव रेल्वेस्थनकामागे) असे अटकेतील गुन्हेगाराचे नाव आहे. (after serving one year sentence again robbed temple Jalgaon Latest Crime News)

गजानननगरातील जागृत महादेव मंदिरात चोरी केल्याचा गुन्हा जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल आहे. सुरेश केवारे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, गजानननगरातील चोरीच्या घटनेत केवारे असल्याची माहिती निरीक्षक किशनराव नजनपाटील यांना मिळाली होती. त्यांच्या पथकातील विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, अविनाश देवरे, हरीश परदेशी यांच्या पथकाने रेल्वेस्थानकामागील पुलाखालून सुरेशला ताब्यात घेतले.

पोलिसांनी खाक्या दाखविल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, शहरातील आणखी काही चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी सुरेश कैवारे याला जळगाव शहरातील मंदिरातून साहित्य चोरीच्या गुन्ह्यात एका वर्षाची शिक्षा झाली आहे. शिक्षा भोगून आल्यावर त्याने पुन्हा चोरीचा धंदा सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

आजचे राशिभविष्य - 25 मार्च 2026

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

SCROLL FOR NEXT