Don Shubham Manoj Deshmukh esakal
जळगाव

Jalgaon News : कुख्यात डॉन शुभम देशमुखविरुद्ध MPDA अंतर्गत कारवाई

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : शहरातील कुख्यात डॉन शुभम मनोज देशमुख उर्फ दाऊद म्हणून प्रसिद्ध असलेल्या सराईत गुन्हेगारावर अमळनेर पोलिसांनी ‘एमपीडीए’ कारवाई करून त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना केले आहे. दहा दिवसांत दोन गुन्हेगारांवर एमपीडीए कारवाई झाली असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शुभम मनोज देशमुख (वय २३, रा. पिंपळे रोड) हा शालेय वयापासूनच गुन्हेगारीकडे वळलेला होता. २०१३ पासून ते आजतागायत त्याच्यावर एकूण २७ गुन्हे दाखल आहेत.

त्यात घरफोडी, मोटरसायकल चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, दरोडा टाकण्याचा प्रयत्न, बेकायदा हत्यार वापरणे, जबरी दुखापत करून चोरी, पोलिसांवर हल्ला करणे, पोलिसांच्या तावडीतून पळून जाणे, दारू पिण्यासाठी हॉटेलवर धुडगूस घालणे, पत्नी, सासूला जीवे मारण्याची धमकी, फारकत झालेल्या पत्नीला ॲसिड हल्ला करून जीवन उद्ध्वस्त करण्याची धमकी, असे अनेक गुन्हे दाखल आहेत. (Against infamous Shubham Deshmukh Action under MPDA Sent to Nashik Jail Jalgaon News)

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

तसेच तो अल्पवयीन असताना शेगाव येथील नगरसेवकाच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. अमळनेर तालुका व परिसरात त्याची दहशत होती.

पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी गुन्हेगारांना कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस कर्मचारी किशोर पाटील यांनी प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे पाठवला होता.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव मंजूर करताच पोलिस नाईक रवी पाटील व दीपक माळी यांनी शिवम उर्फ दाऊद याला पकडून आणले.

त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा व धोकादायक व्यक्तीविरुद्ध कायदा अधिनियम अंतर्गत कारवाई करून पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलिस कर्मचारी कपिल पाटील, पोलिस नाईक हितेश चिंचोरे, जितेंद्र निकुंभे यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

गुन्हेगारांवर वचक बसणार

मागील १३ दिवसांत अमळनेर पोलिस ठाण्याअंतर्गत ‘एमपीडीए’ची ही दुसरी कारवाई असल्याने गुन्हेगारांवर वचक बसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT