Cotton Purchasing Centre  esakal
जळगाव

Agriculture News : कापूस खरेदी करताना मार्केट फी 55 पैसे करा; CCIचे जिल्हा उपनिबंधकांना पत्र

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) खुल्या बाजारात कापूस खरेदीसाठी उतरणार आहे. याची तयारी ‘सीसीआय’ ने सुरू केली आहे. इतर राज्यात बाजार समितीची बाजार शुल्क अतिशय कमी आहे. जळगावला ते एक रुपये पाच पैसे आहे. मात्र शेतकऱ्यांना कापूस खरेदी करताना मार्केट फी केवळ ५५ पैसे आकारावी, असे पत्र ‘सीसीआय’ ने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला दिले आहे. त्यावर जिल्हा उपनिबंधक कार्य निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.

जळगाव जिल्ह्यात ‘सीसीआय’ तर्फे जळगाव, पाचोरा, शेंदुर्णी, पहूर, जामनेर, बोदवड, भुसावळ, चोपडा या ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खुल्या बाजारात आठ हजार २०० ते ४०० रुपयांचा दर देऊ. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खरेदी केंद्रे वाढवू, असे ठरविण्यात आले आहे.

शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीसाठी करताना सर्व शासकीय नियमानुसारच होणार आहे. मात्र शेतकऱ्यांना मालाच्या प्रती शेकडा अधिकचे बाजार शुल्क लावले जाऊ नये, अशी सीसीआयची भूमिका आहे. जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांनी कापसाची सीसीआयतर्फे होणाऱ्या खरेदीसाठी ५५ पैशांपेक्षा अधिक शुल्क आकारले जाऊ नये. राज्यात इतर ठिकाणी मार्केट शुल्क अतिशय कमी आहे. अशी मागणी सीसीआय ने केली आहे.

कापसाला गेल्या वर्षी १३ ते १४ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. तो यंदाही मिळेल, या अपेक्षेने शेतकरी बाजारात कापूस आणत नसल्याचे चित्र आहे. सध्या आठ ते साडेआठ हजारांचा दर खासगी व्यापारी कापसाला देत आहेत. जिल्ह्यात कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्याने कापूस बाजारात विक्रीस येत नाही. यामुळे जिनिंग व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. व्यापारी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी कोंडी दूर करण्यासाठी सीसीआय खुल्या बाजारात कापूस खरेदीसाठी उतरणार आहे.

''‘सीसीआय’ जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू करणार आहे. बाजार समित्यांनी मार्केट शुल्क ५५ पैसे आकारावे असे मागणी आहे. त्याबाबत सोमवारी (ता.१९) सर्व बाजार समित्यांच्या संबंधितांची बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यात याबाबत निर्णय घेतला जाईल.''

- संतोष बिडवई, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT