Shasan Aplya Dari  esakal
जळगाव

CM In Pachora : मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रिमंडळ 26 ऑगस्टला पाचोऱ्यात

सकाळ वृत्तसेवा

CM Eknath Shinde : राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या अनोख्या उपक्रमासाठी २६ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ पाचोरा येथे येणार आहे.

तालुकास्तरावरील हा पहिलाच प्रयोग यशस्वी करण्याचा निर्धार केला असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. (All Cabinet including Chief Minister in Pachora on August 26 jalgaon news)

प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आमदारांनी सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, तालुकाप्रमुख सुनील पाटील, चंद्रकांत धनवडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

आमदार किशोर पाटील म्हणाले, की ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम जिल्हास्तरावर राबविला जात असून, त्याला मिळणारा प्रतिसाद व शासनाच्या योजनांचा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणारा लाभ विचारात घेऊन तालुकास्तरावरही हा उपक्रम घेण्याचे निश्चित केले आहे. पाचोरा व भडगाव या दोन्ही तालुक्यांसाठीचा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम येत्या २६ ऑगस्टला पाचोरा येथे होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एम. एम. महाविद्यालयाचे क्रीडांगण ही या कार्यक्रमासाठीची जागा निश्चित करण्यात आली. सर्व विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तयारी जवळपास पूर्णत्वास आणली आहे. तालुकास्तरावरील हा पहिलाच कार्यक्रम यशस्वी करण्याचा व राज्यभरात तालुकास्तरावरील कार्यक्रम आदर्श पॅटर्न ठरेल, या दृष्टिकोनातून तयारीला गती देण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाची तयारी पूर्णत्वास नेली असल्याचे आढावा बैठकीत सांगितले. पाचोरा व भडगाव तालुक्यांतील जनतेने यासाठी उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT