all police taking convenience duty will be investigated sakal news impact jalgaon new esakal
जळगाव

Sakal Impact : पोलिस दलातील ‘छुपे-रुस्तम’ मैदानात; सोयीची ड्यूटी घेणाऱ्या सर्वांची होणार चौकशी

रईस शेख

Sakal Impact : पोलिस मुख्यालयातील हजेरी मास्तरांचे प्रताप उघड करणारी मालिका यापूर्वीच ‘सकाळ’ने विस्तृत स्वरूपात मांडली. त्याची दखल घेत पोलिस अधीक्षकांनी १२६ कर्मचाऱ्यांना हुडकून काढले आहे. (all police taking convenience duty will be investigated sakal news impact jalgaon news)

या सर्व कर्मचाऱ्यांची आता सकाळी व सायंकाळी हजेरी घेण्यात येणार असून, चार हजेरी मास्तरांची खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यात चौघांचे प्रताप निलंबनाच्या कारवाईपर्यंत नेणार असल्याचे सांगण्यात येते.

जिल्‍हा पोलिस दलातील मातब्बर पोलिसांनी नोकरी केवळ नावाला ठेवली आहे. या नोकरीच्या नावाने वेगळेच धंदे ही मंडळी करते. त्यात कुणी वाळू ठेकेदार झाला आहे, कुणी वाळू वाहतूकदार आहे, तर काहींनी बिल्डरशीप सुरू केलीय, खरेदी-विक्रीच्या धंद्यात बहुतेक मंडळी कार्यरत आहेत.

पैशांनी गब्बर झालेल्या पोलिसांकडून ड्यूट्या होत नाहीत किंवा त्यांना ज्या मलाईच्या ठिकाणी नोकरी करायची आहे, तेथे त्यांना पोस्टिंग मिळत नाही, अशा कर्मचाऱ्यांनी थेट मुख्यालयच आपला अड्डा बनविला आहे.

मग मुख्यालयातील अधिकाऱ्यांची ‘जी-हुजूरी’ आणि हजेरी मास्तरांना महिन्याला ठराविक रक्कम मोजायची आणि ड्यूटी न करता महिन्याचा पगार लाटायचा, असे धंदे या मंडळींनी सुरू केले होते. हजेरी मास्तरांच्या प्रतापाची ‘सकाळ’ने मालिका प्रसिद्ध करून लक्ष वेधले.

त्यातच व्हीआयपींकडे सुरक्षा व्यवस्थेत नियुक्त कर्मचाऱ्यांना ड्यूट्यांसह सुट्यांसाठी प्रत्येकी पैशांची मागणी होत असल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली होती. त्या अनुषंगानेही हजेरी मास्तर प्रकरण प्रकाशझोतात आले.

पोलिस दलाच्या मनुष्यबळचा गैरवापर

गब्बर पोलिसांना लपण्यासाठी एटीसी, आर्थिक गुन्हे, लाइन पिकेट-पेट्रोलिंग, गरज नसताना पोलिस स्पोर्ट अंतर्गत टेनिस ग्राउंडवर सहा आणि फुटबॉल मैदानावर चार ते सहा कर्मचारी, पोलिस वसाहतीला गस्तीला सहा कर्मचारी केवळ कागदावर नेमले जातात, पाणी पिकेटसाठी आठ कर्मचारी नेमले जातात.

प्रत्यक्षात त्याठिकाणी एकच कर्मचारी असल्याचे आढळले आहे. लाइन पिकेट गरज नसताना १२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्यक्षात त्या ठिकाणी एक अथवा दोन कर्मचारी नेमल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिमसाठी चार कर्मचारी नेमले आहेत. त्याठिकाणी प्रत्यक्षात एक अथवा दोन कर्मचारी आहेत. मग, हे गैरहजर कर्मचारी जातात कुठे?, गैरहजर कर्मचारी बाहेर वेगळ्याच उद्योगात लिप्त असल्याचे व महिन्याला हजेरी मास्तरांना ठराविक रक्कम देऊन छुप्या ठिकाणी कागदारवर ड्यूट्या करत असल्याचे उघडकीस आले आहे.

स्पेशल १२६ हजेरीवर

पोलिस अधीक्षकांच्या सूचनेवरून शोध घेतल्यानंतर तब्बल १२६ कामचुकार पोलिस कर्मचारी या हजेरी मास्तरांनी वेगवेगळ्या ड्यूट्यांवर लपवून ठेवले होते. या सर्व कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सकाळी नऊ आणि सायंकाळी सातला हजेरी लावण्याचे बजावले आहे. परिणामी, काही दिवस का असेना, या मातब्बर पोलिसांना कुठे बाहेर जाता येणार नाही.

‘त्या’ चौघांची चौकशी सुरू

मुख्यालयात एकूण सात ते आठ हजेरी मास्तर आहेत. वास्तविक हे काम नियोजनबद्ध दोनच वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे आहे. असे असताना हजेरी मास्तरांचीच संख्या आठ झाली आहे. पूर्वी एक नाशिक रीटर्न वाघ साहेबांच्या तक्रारी आल्याने ते बाजूला झाले, तर कलीम दादा, धनराज बडगुजर, प्रमोद कोळी, पांडव, असे लोक कार्यरत असून, हजेरी मास्तर युवराज देवरे, विशाल पाटील आणि राठोड यांची गृह विभागाच्या ‘डीवायएसपीं’कडून चौकशी सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT