Mangrool Medium Project on Bhokri river overflow.  esakal
जळगाव

Jalgaon Rain Damage : रावेर तालुक्यात हाहाकार! माजी उपनगराध्यक्ष बेपत्ता; 20 जनावरे गेली वाहून

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Rain Damage : महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये बुधवारी (ता. ५) सायंकाळी झालेल्या ढगफुटीमुळे तालुक्यातील जवळपास सर्वच नदी-नाल्यांना पूर आला.

या पुरात तालुक्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला असून, एक जण बेपत्ता आहे. या अचानक आलेल्या पुरात २० जनावरे वाहून गेली असून, १४५ घरांचे नुकसान झाले आहे. (Almost all rivers and streams in taluka were flooded due to cloudburst jalgaon rain damage news)

तालुक्यातील मोरव्हाल येथील बळीराम रायसिंग बारेला (वय ४५) हा शेतमजूर किराणा घेण्यासाठी गेला असता अभोडा नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला.

सकाळी त्याचा मृतदेह सापडला तर शहरातील फुकटपुरा भागातील शेख इकबाल शेख सत्तार (वय ५६) हे नागझिरी नाल्याशेजारील आपल्या घरात पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने घराची भिंत पडून आणि पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

घरात शिरलेले पुराचे पाणी.

येथील माजी उपनगराध्यक्ष आणि रावेर शिक्षण संवर्धक संघाचे संचालक सुधीर गोपाळ पाटील (वय ४८) हे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या जुन्या घरातून अवघे २०० मीटर अंतरावर असलेल्या नवीन घरात येत असता मोटरसायकल घसरल्याने नागझिरी नाल्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आज सकाळपासून त्यांचे नातेवाईक आणि प्रशासनाने युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू केले असून, सायंकाळी उशिरापर्यंत ते आढळून आले नाहीत. त्यांची मोटारसायकल नाल्यात आढळून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT