While inviting Deputy Chief Minister Ajit Pawar to the Sahitya Samela, Prof. Usha Tambe, Prof. Dr. Ujjwala Mehndale, Prof. Dr. Narendra Pathak.  esakal
जळगाव

Amalner Marathi Sahitya Sammelan: अमळनेरच्या साहित्य संमेलनास अजित पवार उपस्थित राहणार

अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटन कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Amalner Marathi Sahitya Sammelan: अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटन कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत. (Amalner Marathi Sahitya Sammelan Ajit Pawar will attend jalgaon news)

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्याध्यक्षा प्रा. डॉ. उज्ज्वला मेहंदळे व संमेलनाचे समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांनी मुंबईत पवार यांची भेट घेऊन साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले.

या वेळी अजित पवार म्हणाले, की आदरातिथ्याच्या बाबतीत जळगावचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. त्यामुळे साने गुरुजींच्या कर्मभूमीत होत असलेले साहित्य संमेलन निश्चितच यशस्वी ठरेल.

संमेलनाचे निमंत्रक तथा पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यासाठी विशेष मेहनत घेत असून, त्यांच्या माध्यमातून साहित्य संमेलनाच्या तयारीची माहिती मी नियमितपणे घेत असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले. खानदेशला मोठी साहित्यिक परंपरा आहे. ही परंपरा ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अजून बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चर्चेदरम्यान पवार यांनी संमेलनाच्या तयारीची सविस्तर माहिती घेत कामाबद्दल समाधान व्यक्त केले. संमेलनासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे सांगत संमेलनाच्या उद्‍घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT