Leader of the Opposition Sunil Mahajan Amrit taking information from the officials about stage number one. esakal
जळगाव

Jalgaon : ‘अमृत टप्पा 1’चे 2 महिन्यांत मिळणार पाणी! मक्तेदार, अधिकाऱ्यांची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ‘अमृत टप्पा एक’चे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मक्तेदार व अधिकाऱ्यांनी दिली. महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी सोमवारी (ता. १०) बैठक घेतली.सतरा मजली इमारतीत झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी ‘अमृत टप्पा एक’चा पूर्ण आढावा घेतला. (Amrut phase 1 will get water in 2 months testimony of monopolies officials gbp00)

या वेळी मक्तेदाराचे प्रतिनिधी तसेच पाणीपुरवठा अभियंता संजय नेमाडे, प्रकल्प अधिकारी योगेश बोरोले आदी उपस्थित होते. ‘अमृत टप्पा एक’बाबत माहिती देताना पाणीपुरवठा अभियंता नेमाडे यांनी सांगितले, की अमृत टप्पा एकचे १६ झोन तयार करण्यात आले आहेत.

त्यातील सुप्रीम कॉलनी, पिंप्राळा निमखेडी झोनचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा पाणीपुरवठाही सुरू झाला आहे. उर्वरित १३ झोनचे काम अद्याप बाकी आहे. शहरात ६८ हजारांपैकी ६५ हजार नळ कनेक्शन जोडण्यात आले आहेत. उर्वरित नळ कनेक्शनही लवकरच जोडण्यात येईल.

दोन महिन्यांत पूर्णत्वाची हमी

अमृत टप्पा एकचे काम पूर्णत्वाबाबत विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी विचारणा केली. त्या वेळी मक्तेदार व अधिकारी यांनी सांगितले, की दोन महिन्यांत संपूर्ण काम पूर्ण करून त्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल.

तीन झोन महापालिकेकडे

शहरात अमृत टप्पा एकचे पूर्ण झालेले तीन झोन सद्यःस्थितीत मक्तेदाराकडे आहेत. त्यांच्यामार्फत त्याची देखभाल करण्यात येत आहे. आता हे तीन झोन महापालिकेने हस्तांतरित करून घ्यावेत, असे मत मक्तेदारातर्फे व्यक्त करण्यात आले. महापालिका पाणीपुरवठा लवकरच हे तीन झोन हस्तांतरित करून घेणार असल्याचेही पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT