Anandacha Shidha News esakal
जळगाव

Anandacha Shidha : ‘गौरी-गणपती’मध्ये 100 रूपयांत आनंदाचा शिधा! जिल्ह्यात 6 लाख लाभार्थी

सकाळ वृत्तसेवा

Anandacha Shidha : ‘गौरी-गणपती’ उत्सवात राज्यातील गोरगरीबांना अवघ्या १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे लाखो गोरगरीबांना ऐन सणासुदीत दिलासा मिळणार आहे.

त्यात प्रत्येकी एक किलो रवा, चणा डाळ, साखर, खाद्य तेल या जिन्नसाचा समावेश आहे. जिल्ह्यात सहा लाखांवर रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. दरम्यान, संबंधीत पुरवठादाराकडून अद्याप पाकिटांचा पुरवठा झालेला नाही. (anandacha shida for 100 rs in in Gauri Ganpati jalgaon news)

राज्य शासनाने गतवर्षी दिवाळीत व नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आनंदाचा शिधा १०० रुपयात दिला होता. यंदाही राज्यातील एकूण १ कोटी ६५ लाख ६० हजार २५६ शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल.

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. डाळीही महागल्या आहेत. खाद्य तेलाचे दर अवाक्यात असले, तरी गोरगरीबांना दैनंदिन रोजगारात दिवाळीसह अन्य सणही साजरे करणे सोपे नाही. यामुळे हा आनंदाचा शिधा वाटपाचा निर्णय शासनाने घेतला आहे.

तालुकानिहाय लाभार्थी

तालुका एकूण लाभार्थी

जळगाव ७८,३६३

यावल ४०,८६१

एरंडोल २५,२३९

धरणगाव २९,४४४

पारोळा ३०,४७८

अमळनेर ५०,७८६

जामनेर ४८,९६४

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भुसावळ ३९,५३७

मुक्ताईनगर १६,३६६

कुऱ्हा ११,४०४

बोदवड १५,२७३

रावेर ३५,६७८

चोपडा ४६,५०१

पाचोरा ४६,०१९

भडगाव २६,५०४

चाळीसगाव ६१,११३

एकूण ६ लाख २० हजार ६५०

"जिल्ह्यातील ६ लाख २० हजार ६५० जणांना हा लाभ मिळेल. प्रत्येक लाभार्थीपर्यंत शिधा पोहोचावा यासाठी प्रशासनातर्फे अजून सबंधित पुरवठादाराकडून आनंदाच्या शिधा पाकीटांचा पुरवठा झालेला नाही. तो झाला की लगेच वाटप सुरू होईल." -संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT