Students waiting for the bus at the bus stop.  esakal
जळगाव

Jalgaon News : बसवाहक, चालकांची मनमानी; पालकांचा ‘रास्तारोको’चा इशारा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथून शालेय व महाविद्यालयीन असे सुमारे दोनशेवर विद्यार्थिनी अमळनेर येथे दररोज ये-जा करतात. पातोंडा येथून जलद व शटल सर्व प्रकारच्या बसेसला थांबा आहे. परंतु राज्य परिवहन बसचे वाहक व चालक विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास हेतुपुरस्सर मनाई करतात.

चालक व वाहकांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांना तासंतास पातोंडा व अमळनेर बसस्थानकावर ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांसह पालकांनी रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. (Angry students along with parents warned of roadblocks due to bus inconvenience jalgaon news)

दरम्यान, शुक्रवारी (ता. ११) चोपडा - साक्री (साक्री आगार) बसचे वाहक भूषण गुरव (बिल्ला नंबर २६३५३) यांनी पातोंडा येथून विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास नकार दिला. उपस्थित पालकांनी विचारपूस केली असता पालकांशी उर्मटपणे उत्तरे दिली.

प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तन करून अर्वाच्य भाषेचा वापर केला, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी पालकांकडे केल्यानंतर पालक महेंद्र पाटील, भूषण पवार, रामकृष्ण लोहार, संभाजी पाटील, गोरख शिंदे आदी पालकांनी वाहक भूषण गुरव याच्याविरोधात अमळनेर आगारप्रमुख पठाण यांच्याकडे फोनवरून तक्रार केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परंतु राज्य परिवहन अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. दरम्यान, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची लेखी तक्रार पालकांनी जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांचेकडे केली आहे. राज्य परिवहन अधिकाऱ्यांनी ही समस्या त्वरित सोडवावी; अन्यथा पालक विद्यार्थ्यांसह रास्ता रोको करणार असल्याचे पालकांनी सांगितले.

"पातोंडा बसस्थानकावर राज्य परिवहनच्या सर्व बसेसला थांबा आहे. विद्यार्थ्यांना अमळनेर ये-जा करताना शटल व जलद बसेच्या वाहकांनी बसमध्ये चढू न देण्याची तक्रार प्राप्त झाली असून, चोपडा व अमळनेर आगारप्रमुखांना फोनवरून सांगितले आहे. तसेच अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, साक्री आगारप्रमुख, धुळे व नाशिक विभागप्रमुखांना वाहकांच्या वर्तवणुकीबाबत लवकरच लेखी स्वरूपात पत्र पाठविण्यात येतील." - दि. गु. बंजारा, वाहतूक नियंत्रण, अधिकारी, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT