SYSTEM
जळगाव

जनावरे चोरणारे दोघे अट्टल जाळ्यात; 20पेक्षा जास्त गुन्हे दाखल

जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणाहून जनावरांची चोरी करणाऱ्या कुरेशी बंधूंना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणाहून जनावरांची चोरी करणाऱ्या आणि आठ महिन्यांपासून वीसपेक्षा जास्त गुन्ह्यात ‘वॉन्टेड’ असणाऱ्या मूळच्या अमळनेरच्या दोघा कुरेशी बंधूंना पोलिसांनी अटक केली आहे.

जळगाव जिल्ह्यात अमळनेर, चाळीसगाव, पारोळा, चोपडा, धरणगाव आदी ठिकाणी आपल्या साथीदारांच्या मदतीने चारचाकी आणून जनावरे चोरणारे मुख्य सूत्रधार रशीद शफी कुरेशी व शकील शफी कुरेशी (मूळ रा. कसाली मोहल्ला, अमळनेर, ह.मु. मालेगाव) हे अमळनेरच्या चार गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड होते. ते फरार असल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध ‘स्टँडिंग वॉरंट’ काढले होते. रशीद आणि शकील गुन्ह्यांमधील मास्टर माईड होते. कुठून कोणती जनावरे कशी उचलायची याच्यावर ते पाळत ठेवत असत आणि वाहतूक करताना संशय येऊन नये, म्हणून भगवा झेंडा असलेली गाडी वापरत असत.

रशीद कुरेशी हा मालेगावला स्थायिक झाला होता. त्याच्यावर इतर राज्यात देखील गुन्हे दाखल आहेत. रशीद याने मालेगावला पाचव्यांदा विवाह केला असून, अजून एक नवा संसार थाटल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी ताबडतोब सहा पोलिस उपनिरीक्षक विलास पाटील, मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे यांना मालेगाव येथे पाठवले. रशीद हा गुलाबबाबा दर्गा माळदे येथे लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र शकील सापडला नाही. रशीदला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने शकील शनिवारी (ता.२२) चोपडा येथून बसने मालेगाव येणार असल्याची माहिती देताच पोलिसांनी अमळनेर बसस्थानकावर सापळा रचून शकील याला देखील बसमधून ताब्यात घेतले. दोघांना चोपडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir: इस्रोच्या मदतीने रामललाचा अलौकिक 'सूर्याभिषेक'! ४ मिनिटे कपाळावर चमकली सूर्याची किरणे

Meta Brain : माणसाचा मेंदू कॉपी करत आहे Meta! बनवला 'डिजिटल ब्रेन'; जो पाहू अन् ऐकू शकतो, आता मशीन समजून घेणार तुमच्या भावना

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : येवला बाजार समिती सहा दिवस बंद, कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

PSL 2026 : पाकिस्ताच्या मुश्ताक अहमदचा उद्धटपणा... Live TV वर इंग्लंडच्या खेळाडूची लाज काढायला गेला अन् मग... Video Viral

SCROLL FOR NEXT