CEO Ankit and officers inspecting the animals infected with 'Lumpi'.  esakal
जळगाव

Jalgaon Lumpy Disease : चाळीसगावात जनावरांना ‘लंपी’ची लागण; पशुपालकांना न घाबरण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lumpy Disease : चाळीसगावसह परिसरात लंपी सदृश्य जनावरे आढळून आल्यानंतर बुधवारी (ता. २३) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी चाळीसगाव तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन प्रत्यक्ष गोठ्यात जात जनावरांची पाहणी केली.

या वेळी त्यांनी पशु पालकांशी संवादही साधला. (Animals infected with lumpy skin disease in Chalisgaon jalgaon news)

ते म्हणाले, की लंपी या रोगाला अटकाव घालण्यासाठी प्रशासन आपल्या पातळीवर पूर्णपणे सज्ज असून, विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे.

गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यासह परिसरात लंम्पी आजाराची लागण झालेली जनावरे आढळून आली आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत या भागात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्याबरोबरच विविध खबरदारीच्या उपाययोजना देखील केल्या जात आहेत.

श्री. अंकीत यांनी चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा, मुंदखेडा, तळेगाव, तसेच शहरातील विविध भागांत भेट देऊन प्रत्यक्ष गोठ्यात जात जनावरांची पाहणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाहेद तडवी, पशुसंवर्धन विभागातील अधिकारीही या वेळी उपस्थित होते. लंपी सदृश्य जनावरे आढळून आलेल्या गोठ्यांमध्ये नियमित फवारणी करावी.

आजाराची लागण झालेल्या जनावरांचे विलीनीकरण करावे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे आजाराच्या संदर्भातील औषधांचा पुरेसा साठा असून, औषधांचा नियमित पुरवठा करावा.

पशुवैद्यकांनी देखील नियमित भेटी द्याव्यात, अशा सूचना श्री. अंकीत यांनी दिल्या. पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घेताना लंपीची लक्षणे आढळून आल्यानंतर तत्काळ पशुवैद्यकांना कळवावे. साथ पूर्णपणे नियंत्रणात असून, पशुपालकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या भाषणानंतर सोनं 1,600 रुपयांनी महाग; चांदी 2 महिन्यांच्या उच्चांकावर; काय आहे ताजा भाव?

रितेश देशमुखने चक्क देव्हाऱ्यात ठेवलीये महाराजांशी संबंधित ती गोष्ट, ऐकून विकी कौशलही झाला भावुक; काय आहे ती वस्तू?

NEET UG 2026 Exam Cancelled: ९ वर्षांत १६ हून अधिक परीक्षा रद्द! २०१७ मध्ये स्थापन झाल्यापासून NTA का अन् कशी अपयशी ठरत आहे?

Leopard Captured : चाकणला मर्सिडीज बेंज कंपनीतील बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद

Metro 13 : मिरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो १३ ला प्रतीक्षा मंत्रिमंडळाच्या मान्यतेची

SCROLL FOR NEXT