Ration Card Sakal
जळगाव

Jalgaon News : अंत्योदय कार्डधारकांची दिवाळी साखरेविना ‘कडू’

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्य शासन एकीकडे रेशन कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करून गोरगरिबांची दिवाळी गोड करत आहे. त्याचवेळी दुसरीकडे अंत्योदय कार्डधारकांना गेल्या नोव्हेंबरपासून होणारा प्रतिकार्ड एक किलो साखरेचा पुरवठा बंद केला आहे.

यामुळे जिल्ह्यातील एक लाख ३७ हजार २११ अंत्योदय कार्डधारक ऐन दिवाळीत साखरेपासून वंचित आहेत.( Antyodaya card holders Diwali without anandacha shidha jalgaon news )

जिल्ह्यातील रेशन दुकानांना दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत संबंधित कार्डधारक संख्येनुसार गहू, तांदूळ, साखरेचा पुरवठा केला जातो. महिनाअखेर जेवढे धान्य कार्डधारक नेतात, तेवढे सील करून ई-पास मशिनवर थम्ब घेणे बंद केले जाते. जेणेकरून एका महिन्याचे धान्य दुसऱ्या महिन्यात दिले जाऊ नये.

पुढील महिन्यात पाच तारखेनंतर परत त्या महिन्यातील धान्याचा पुरवठा केला जातो. मात्र गेल्या नोव्हेंबरपासून अंत्योदय वर्गातील कार्ड असलेल्या कार्डावर साखरेचा पुरवठा झालेला नाही. अंत्योदय कार्डधारकांना ३५ किलो धान्य व एक किलो साखर मिळते. मात्र ती न मिळाल्याने कार्डधारकांचे साखरेचे गणित बिघडले आहे.

एकीकडे शासनाने दिवाळीपूर्वी ‘आनंदाचा शिधा’ शंभर रुपयांत दिला. त्यात तेल, साखर (एक किलो), रवा, हरभराडाळ, पोहे, मैदा (अर्धा किलो) अशा सहा वस्तू ‘आनंदाचा शिधा’ म्हणून दिले. यामुळे गोरगरिबांना दिलासा मिळाला. मात्र दुसरीकडे नियमित साखर देणे दोन महिन्यांपासून बंद केले आहे. यामुळे कार्डधारक नाराज आहेत.

दोन महिन्यांची साखर मिळेल का?

एका महिन्यातील धान्य दुसऱ्या महिन्यात कार्डधारकांना दिले जात नाही. मग ऑक्टोबरमधील साखर नोव्हेंबरमध्ये कार्डधारकांना मिळेल का? आणि मिळाली तरी दोन्ही महिन्यांची एकदम मिळेल का? अशी विचारणा रेशन कार्डधारक दुकानदारांकडे करीत आहेत.

''साखरेचा पुरवठा राज्य शासनाकडून झालेला नाही. साखरेचा पुरवठा झाला, की संबंधित रेशन दुकानदारांना पुरवठा होईल. त्या साखरेचे कसे वाटप करायचे याबाबत संबंधित तहसीलदार निर्णय घेतील.''- संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT