farming
farming esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : चांगला पाऊस पडेपर्यंत पेरणीची घाई करू नये; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाकूर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Agriculture News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठराविक कापूस वाणाचा आग्रह न धरता आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार बाजारात उपलब्ध असलेल्या कापूस वाणाची निवड करावी. (Appeal by agriculture officer not to rush sowing until good rains jalgaon news)

सर्व कापूस वाण उत्तम दर्जाचे असल्याने पेरणीची घाई न करता ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस पडल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस पिकाचे अंदाजे पेरणी क्षेत्र ५ लाख ५० हजार हेक्टर असून, कापूस हे पीक जिल्ह्यात मुख्य नगदी पीक आहे. कापूस बियाणे लागवडीसाठी २७ लाख ५० हजार पाकिटांची आवश्यकता असून, लागवडीसाठी आवश्यक कापूस बियाणे जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरीया, डीएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खतांचा साठा असल्यामुळे या वर्षी खतांचा तुटवडा होणार नाही. कापूस बियाणे, खते जादा दराने व बिना बिलाने खरेदी करू नये.

जिल्ह्यात कुणीही, कुठेही कृषी निविष्ठाची जादा दराने विक्री करीत असल्याचे दिसून आल्यास कार्यालयाचा दूरध्वनी ०२५७-२२३९०५४ व मोबाईल क्रमांक ८९८३८३९४६८ वर माहिती द्यावी, असेही श्री. ठाकूर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT