Art Branch of Junior Colleges in trouble need to change the number of students rule Jalgaon News psl98 esakal
जळगाव

Jalgaon News: कनिष्ठ महाविद्यालयांची कला शाखा सलाईनवर! विद्यार्थीसंख्येचा नियम बदलण्याची गरज

उमेश काटे

Jalgaon News : राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची कला शाखा सद्यस्थितीत सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे.

अधिकारी घडवणाऱ्या या शाखेकडे आता विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त आहेत. त्यामुळे शासनाने काळानुसार जुने धोरण बदलून नवीन धोरण आणावे, अशी अपेक्षा शिक्षणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना कला शाखेच्या तुकडीसाठी शहरी भागात १२० विद्यार्थी व ग्रामीण भागामध्ये ८० विद्यार्थी संख्या असली पाहिजे, असा नियम आहे.

परंतु, सध्याची परिस्थिती बघता कला शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी झाली आहे. पर्यायाने अनेक कनिष्ठ महाविद्यालयांत जागा रिक्त आहेत.

त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या तुकडीसाठी विद्यार्थीसंख्येची अट शिथिल करून शहरी भागातील कनिष्ठ महाविद्यालयांना ८० व ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांना ६० याप्रमाणे विद्यार्थीसंख्या निश्‍चित करावी.

अनेक वर्षापासून असलेली ही अट आता काळानुसार बदलली पाहिजे, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे धोरणामध्ये बदल करणे आवश्यक ठरत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अन्यथा शिक्षकांची उपासमार

‘मागेल त्याला तुकडी’ या उक्तीप्रमाणे स्वयंम अर्थशासीत तुकड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनुदानित तुकड्यांमधील विद्यार्थीसंख्येवर मात्र त्याचा विपरित परिणाम झाला आहे. कारण, बऱ्याच महाविद्यालयांमध्ये स्वयंम अर्थशासीत विज्ञान शाखेच्या तुकड्या वाढल्या आहेत.

परिणामी याच शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला असून, कला शाखेतील तुकड्या ओस पडू लागल्या आहेत. हेच चित्र कायम राहिले, तर कला शाखेतील तुकडीवर नियुक्त असलेल्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

त्यांना इतर महाविद्यालयांत समायोजन करण्याची वेळ येणार आहे. मात्र, राज्यात सर्वत्रच कला शाखेची सारखीच परिस्थिती असल्याने समायोजन तरी कुठे होईल? असा यक्षप्रश्‍नही या प्राध्यापकांसमोर उपस्थित होणार आहे.

एकीकडे शासनाचे अनुदानित तुकड्या बंद करण्याचे छुपे धोरण असल्याचे चित्र दिसत आहे. तर, दुसरीकडे शासन स्वयंम अर्थशासीत गोष्टींना प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे.

शालेय शिक्षणमंत्र्यांना साकडे!

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांची कला शाखेची विद्यार्थी संख्येची अट शिथिल करण्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, यासाठी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update: राज ठाकरे मातोश्रीवर दाखल!

SCROLL FOR NEXT