Fake Additional Collector Case esakal
जळगाव

Jalgaon Crime News : ठेकेदाराच्या डोक्यात घातली सळई

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : दारू पिण्यासाठी पैसे देत नाही, म्हणून कामगाराने चक्क बांधकाम ठेकेदाराच्या डोक्यातच लोखंडी सळई घालून जखमी केले. (as not given rupees for alcohol to worker injured contractor by putting an iron rod on his head jalgaon news)

ही घटना चिंचोली वीज उपकेंद्रात घडली. सरकारी ठेकेदार संजय वराडे (रा. अयोध्यानगर, जळगाव) रविवारी (ता. १९) दुपारी दोनच्या सुमारास चिंचोली (ता. जळगाव) येथील वीज उपकेंद्राच्या आवारात असताना, तेथे दारूच्या नशेत जालम शोभाराम पवार आला.

त्याने संजय वराडे यांना आणखी दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, अगोदरच तू दारू पिऊन आला असताना, परत कशाला पैसे पाहिजेत, असे सांगत वराडे यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे जालम पवार याने लोखंडी आसारी वराडे यांच्या डोक्यात मारून दुखापत केली,

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

तसेच शिवीगाळ करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत जखमी वराडे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात जालम शोभाराम पवार (रा. सुप्रीम कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस नाईक मुदस्सर काझी तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minister Jaykumar Gore: युती होणार, कोणीच रोखू शकत नाही; पालकमंत्री जयकुमार गोरे, युती रखडली का? यावर काय म्हणाले?

Horrible Accident: मदतीसाठी किंकाळ्या, पण दार उघडलेच नाही… 17 जीव आगीत होरपळले, भीषण बस दुर्घटना!

Kashmiri Pheran: लोकल ते ग्लोबल ओळख बनलेला काश्मिरी फेरन, वाचा कसा बनतो आणि काय आहे त्याची खासियत

Tigress Tara: कसणी परिसरात तारा वाघिणीचा फेरफटका; कॉलर रेडिओद्वारे देखरेख, एसटीसमोरूनच रस्ता ओलांडत हाेती अन्..

अयोध्येची राजकुमारी 2 हजार वर्षांपूर्वी कोरियाला गेली, तिथल्या राजाशी लग्न केलं; अयोध्येत भव्य पुतळ्याचं अनावरण

SCROLL FOR NEXT