ST Bus News esakal
जळगाव

Ashadhi Ekadashi 2023 : पंढरपूर वारीसाठी 135 जादा बस; सर्व आगारांमधून या तारखेपासून सुटणार बस

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी यंदा जळगाव विभागातून १३५ एसटी बस सोडल्या जाणार आहेत.

यंदा २९ जूनला आषाढी‎ पंढरपूर यात्रा असून, यासाठी जिल्हाभरातून हजारो प्रवासी‎ पंढरपूरकडे जातात. वारकऱ्यांच्या सोयीसाठी जळगाव विभागातर्फे १३५‎ बस तीन‎ टप्प्यांत सोडण्यात येणार‎ आहेत. (Ashadhi Ekadashi 135 ST buses will be released from Jalgaon division for Pandharpur Yatra jalgaon news)

विशेष म्‍हणजे यंदा सवलतींमुळे‎ महिला, ज्येष्ठ नागरिकां‎ची संख्या २५ टक्के वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्‍यानुसार जादा बसचे नियोजन करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले.

२४ जूनपासून या जादा बस विभागातील अकरा आगारांमधून सोडल्‍या जातील. द्वादशीनंतर पंढरपूरहून याच जादा बस भाविकांना परतीच्‍या प्रवासासाठी उपलब्‍ध असतील.

अशा सुटतील बस

जळगाव विभागातून जादा बससाठी तीन टप्‍पे केले आहेत. यात पहिला टप्पा २४ ते २५ जून‎दरम्यान जिल्ह्यातून १०० बस‎ सोडण्यात येणार आहेत, तर २६ ते २७‎ जूनदरम्यान १२५ बस, तर २८ व २९‎ जूनला ४० बस पंढरपूरला‎ सोडण्यात येणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी ३०‎ जूनला द्वादशीला पंढरपूर आगारात‎ १३५ बस तैनात असणार आहेत.‎ एकाचवेळी ३० पेक्षा अधिक‎ प्रवासी असल्यास‎ पंढरपूरसाठी बस सोडली जाणार‎ आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जालना, अहमदनगरलाही सोडणार बस

जळगाव विभागातून जादा बस सोडल्‍या जात आहेत. शिवाय प्रवाशांच्या‎ सोयीसाठी इतर आगारांना मदत‎ म्हणून यंदा जालन्यासाठी ५०,‎ अहमदनगरसाठी ७५ बस‎‎ पाठविण्यात येणार आहेत. या १२५‎ बस दोन विभागांना दिल्‍या जाणार असल्या, तरी‎ जिल्ह्यांतर्गत कोणत्याही‎ फेऱ्या कमी होणार नाहीत.

आगारानुसार बसचे नियोजन

आगार...............जादा बस

जळगाव..............२७

यावल................१५

चाळीसगाव...........६

अमळनेर.............११

चोपडा................१५

जामनेर.................९

रावेर..................११

मुक्‍ताईनगर...........७

पाचोरा...............११

भुसावळ.............१३

एरंडोल...............१०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT