Sant Muktabai Palkhi  esakal
जळगाव

विठ्ठलाच्या भेटीला मुक्ताबाई निघाली पंढरीला

मिलिंद वैद्य

जळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानची संत मुक्ताबाईची पालखी आज (ता.१४) पंढरपूरकडे प्रस्थान झाली. पुंडलिक वरदे हरी विठ्ठलच्या गजरात पालखीला जळगाव नगरीतून निरोप देण्यात आला.

गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे पालखी सोहळा होऊ शकला नव्हता. त्यामुळे यंदा याबाबत उत्सुकता होती. ठरल्याप्रमाणे वटसावित्री पौर्णिमेच्या मुहूर्तावर संत मुक्ताबाईची पालखी पंढरपूरकडे रवाना होते. त्यानुसार आज सकाळी नऊ वाजता संत अप्पा महाराज समाधी स्थळी पालखीचे विधीवत पूजन होऊन पालखी पुढच्या मार्गाला निघाली. तत्पूर्वी सोमवारी श्रीराम मंदिरात पालखीचे कुमारिकांच्या हस्ते पूजन होऊन ती अप्पा महाराज समाधी स्थळी मुक्कामी राहिली.

आज सकाळी मेहरुण तलाव परिसरातील शिवाजी उद्यानात मुक्ताबाईच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. नंतर वारकरी, भक्तांनी अभंग म्हणत पालखीसोबत प्रयाण केले. श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती हभप मंगेश महाराज जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी पुढच्या प्रवासाला निघाली. वाटेत जैन इरिगेशनच्या वतीने पालखीचे स्वागत व पूजन करण्यात आले. जय हरी विठ्ठलचा गजर करीत पालखी पंढरीकडे रवाना झाली. आषाढी एकादशीनिमित्ताने निघालेली ही पालखी सुमारे साडेसातशे किलोमीटर प्रवास करत पंढरपूरला एकादशीच्या आदल्या दिवशी पोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT