crime
crime esakal
जळगाव

Jalgaon Crime: धक्कादायक! उपजिल्‍हाधिकाऱ्यावरच प्राणघातक हल्ला; वाळू माफियांची वाढली मुजोरी

सकाळ वृत्तसेवा

- तरसोद रस्त्यावर लोळवून डोक्यात हाणली टॉमी

- अटकेतील दोघा वाळूमाफियांना कोठडी; उर्वरित फरार

जळगाव : जळगाव- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरसोद फाट्याजवळ बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे डंपर अडवून कारवाई करताना निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर ८-९ वाळू माफियांनी ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला चढविला.

ही घटना मंगळवारी (ता.६) रात्री साडे आकराला घडली. (Assault on Sub District Officer Sand mafia crime increased Jalgaon News)

जखमींच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलिसांत नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी अवघ्या दोनच हल्लेखोरांना पोलिस अटक करू शकले. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गौतम यशवंत पानपाटील (वय ३८ रा. सावखेडा ता.जि.जळगाव) आणि विठ्ठल भगवान पाटील (वय-३६ रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) असे अटक संशयितांची नावे आहेत.

मंगळवारी रात्री काय घडले?

निवासी उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार (वय-५७.रा.महाबळ) आणि सोबत तहसीलदार बनसोडे, चालक सुरेश महाजन, लक्ष्मण मनोरे असे शासकीय वाहन (एमएच २८ सी ६४२११) घेऊन मंगळवारी (ता. ६) रात्री ११ वाजता अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी बाहेर निघाले होते.

रात्री ११.३० वाजेच्या सुमारास या पथकाला राष्ट्रीय महामार्गावर तरसोद फाट्या जवळ (एमएच १९ बीएम९१९१) वाळूचे डंपर दिसले. डंपर थांबवून त्याची कागदपत्रे तपासत असताना त्याच वेळेस मागून विना क्रमांकाचे दुसरे डंपर सुसाट वेगात जाताना दिसले.

पाठलाग करून अडविले

या डंपरला अडविण्यासाठी दोन्ही वाहन चालक सुरेश महाजन व लक्ष्मण मनोरे अशांना या डंपरला अडवण्यासाठी पाठवले. पाठलाग करून पळून जाणारा डंपर नशिराबाद पुलाजवळून वळवून दोघे परत आणले.

अगोदर पकडलेला डंपर घेऊन बनसोडे जमा करण्यासाठी निघून गेले. दुसरे डंपर तपासत असतानाच दुचाकीसह कारवर आलेल्या आठ-नऊ जणांनी श्री.कासार यांना बोलण्यात गुंतवले. पैकी एकाने चालकाला इशारा करताच, चालक ते डंपर घेऊन जळगावच्या दिशेने पसार झाला.

तत्काळ कासार यांनी शासकीय वाहनाने या डंपरचा पाठलाग केल्यावर चालकाने हा डंपर तरसोद फाट्यावरून वळवून अंधाऱ्या जागेवर डंपर सुरु ठेवून चालक पसार झाला.

अन्‌ कासारांवर हल्ला

पाठलाग करून तेथे धडकल्यावर गाडीतून खाली उतरून पाहणी करत असतानाच विशाल ऊर्फ विक्की ऊर्फ मांडवा नामदेव सपकाळे, गौतम पानपाटील, विठ्ठल भगवान पाटील (रा. ज्ञानदेव नगर) आकाश युवराज सपकाळे, योगेश ऊर्फ रितीक दिगंबर कोल्हे, अमोल छगन कोळी, संदीप ठाकूर, शिवकुमार इंगळे आणि अक्षय नामदेव सपकाळे (सर्व रा. जळगाव)असे धडकले.

आपसांत कुरबुर करत मांडवा, विठ्ठल आणि आकाश अशांनी थेट हल्ला चढवून मारहाण करण्यास सुरवात केली.

डोक्यात हाणली टॉमी

गौतमने डोक्यात लोखंडी टॉमी टाकून रस्त्यावर पाडून बेदम मारहाण करण्यात आली. बचाव करण्यासाठी चालक मनोरे यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला.

त्यांच्या तावडीतून सुटून शासकीय वाहनात शिरल्यावर हल्लेखोरांनी शासकीय वाहन देखील फोडून टाकत घटनास्थळावरून पळ काढला.

वरिष्ठांनी घेतली धाव

जखमी उपजिल्‍हाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना हा प्रकार कळवल्यावर जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर अधीक्षक अशोक नखाते, गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांच्यासह पोलिस- महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळावर धडकले.

जखमी उपजिल्हाधिकारी कासार यांना जिल्‍हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे, सहाय्यक फौजदार अलियार खान यांनी जाब-जबाब नोंदवून नशिराबाद पोलिस ठाण्यात जिवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अटकेतील दोघांना कोठडी

पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेवरून संशयितांच्या शोधात पथके रवाना करून पथकाने गौतम यशवंत पानपाटील आणि विठ्ठल भगवान पाटील अशा दोघांना अटक केली.

संशयितांना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता न्या. श्रीमती एम. एम. बडे यांच्या न्यायालयाने दोघांना सोमवार (ता.१२)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. निखिल कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT