Bharat Suryavanshi (suspect)  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : राहत्या घरातही अल्पवयीन मुली असुरक्षित? आदिवासी मुलीवर राहत्या घरात अतिप्रसंगाचा प्रयत्न...

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरात कुटुंबासह वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर अतिप्रसंग होत असतानाच तिच्या लहान बहिणीने आरडाओरड करून बहिणीच्या अब्रू व जीव वाचविल्याची घटना शुक्रवारी घडली.

संतप्त जमावाने त्या भामट्याची दुचाकी पेटवून देत त्याच पेटत्या दुचाकीवर त्याला टाकण्याचा प्रयत्न केला होता. (Attempted rape on tribal girl jalgaon crime news)

पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत अटक केली. भारत सुभाष सूर्यवंशी (वय ३४, रा. चंदुअण्णानगर) यास आज जिल्‍हा न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

कोल्हे हिल्स परिसरात पत्र्याच्या घरात मोलमजुरी करणारे आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहे. शुक्रवारी (ता. १४) सोळावर्षीय चिमुरडी लहान बहिणीसह एकटीच घरात होती. आई-वडील व दोन्ही भाऊ कामावर गेले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुपारी साडेतीनच्या सुमारास चंदूअण्णानगरात राहणारा भारत सूर्यवंशी (वय ३४) हा त्याच्या दुचाकी (एमएच १९ डीक्यू ७१७८)ने घराजवळ आला. पिण्यासाठी पाणी मागून तो घरात शिरला.

काही वेळातच त्याने पीडितेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. पीडिताच्या लहान बहिणीने आरडाओरड केल्याने शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. संशयिताला चोप देत त्याची दुचाकी पेटवून दिल्यावर त्या पेटत्या दुचाकीवर त्याला टाकण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी संशयिताला जमावाच्या तावडीतून सुटका करून अटक केली.

तालुका पोलिसांत पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊन संशयिताला जिल्‍हा न्यायालयात हजर केले असात न्यायालयाने संशयिताची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

SCROLL FOR NEXT