Dignitaries paying tribute to the martyred soldiers in a program organized by the District Military Office on the occasion of Indian Armed Forces Flag Day on Thursday. esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्यात 3 महिन्यांनी माजी सैनिक दिवस : आयुष प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ज‍िल्ह्यातील माजी सैन‍िकांचे ज‍िल्हा प्रशासनाकडे असलेले प्रलंब‍ित प्रश्‍न, तक्रारी व समस्या सोडवण्यासाठी तीन मह‍िन्यातून एक द‍िवस माजी सैन‍िक द‍िवस साजरा करण्यात येईल, अशी माहिती ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद यांनी द‍िली.

जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे भारतीय सशस्त्र सेना ध्वजद‍िनानिमित्त (ता. ७) झालेल्या कार्यक्रमात श्री. प्रसाद बोलत होते.(Ayush Prasad statement of Ex soldier Day in district after 3 months jalgaon news)

ज‍िल्हा पर‍िषदेचे मुख्य कार्यकारी अध‍िकारी अंकित, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर ज‍िल्हाध‍िकारी अंकुश प‍िनाटे, न‍िवासी उपज‍िल्हाध‍िकारी तथा ज‍िल्हा सैन‍िक कल्याण अध‍िकारी सोपान कासार, सहायक ज‍िल्हा सैन‍िक कल्याण अध‍िकारी संजय गायकवाड, माजी सैन‍िक द‍िनकर पवार आदी उपस्थ‍ित होते. यावेळी उपस्थ‍ितांच्या हस्ते ध्वजन‍िधी संकलन २०२३ चा शुभारंभ करण्यात आला.

श्री.प्रसाद म्हणाले, मागील काही मह‍िन्यात जळगाव ज‍िल्हा व‍िव‍िध उपक्रमांच्या अंमलबजावणीत राज्यात पह‍िल्या व दुसऱ्या क्रमांकावर राह‍िला आहे. ध्वजन‍िधी संकलनात ज‍िल्ह्याने उल्लेखनीय कामग‍िरी केली आहे. माजी सै‍न‍िकांच्या प्रलंब‍ित मुद्यांची यादी तयार करून प्रत्येक मुद्दा न‍ियमांच्या चौकटीत सोडव‍िण्याचा प्रयत्न केला जाईल.

१९ जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार

ज‍िल्ह्यात आजपर्यंत शहीद झालेल्या १९ जवानांच्या पत्नी, माता व पित्यांचा सत्कार करण्यात आला. व‍िव‍िध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैन‍िकांचे पाल्य चेतना गणेश मराठे, ग्रीष्मा दगाजी महाजन, मानसी शांताराम पाटील यांना व‍िशेष पुरस्काराने गौरव‍िण्यात आले.

ध्वजन‍िधी संकलनात शंभर टक्के उद्दिष्ट्य पूर्ण करणाऱ्या शासकीय कार्यालयातील प्रमुख म्हणून उपव‍िभागीय अध‍िकारी, तहसीलदार, गटव‍िकास अध‍िकारी व शासकीय व‍िभागाच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. श्री. गायकवाड यांनी आभार मानले.

ध्वजनिधी संकलनात जिल्हा अव्वल

श्री. कासार यांनी ध्वजन‍िधी संकलनाचे शंभर टक्के उद्दिष्ट्य पूर्ण करण्यात जळगाव जिल्हा अव्वल ठरल्याचे सांगितले. शासनाकडून २०२२ मध्ये ज‍िल्ह्यासाठी १ कोटी १८ लाख १२ हजार ४०० रुपयांचे उद्द‍िष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात १ कोटी ४५ लाख ७१ हजार ८८२ रुपये इतके असे एकूण १२३.३६ टक्के उद्दिष्ट ज‍िल्ह्याने पूर्ण केले आहे.

२०२३ साठी ज‍िल्ह्याला १ कोटी १८ लाख १ हजार ४०० रुपयांचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. ज‍िल्हा सैन‍िक कल्याण कार्यालयातर्फे २०२२ मध्ये २९४ लाभार्थ्यांना ३७ लाख ७० हजार ५५८ रुपयांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT