Bank- 
जळगाव

Jalgaon News : राष्ट्रीयीकृत बँकेत ग्राहकांची पैसे काढण्यासाठी तारांबळ; सुविधांच्या अभावामुळे खातेधारकांचे हाल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील राष्ट्रीयीकृत बँकेत ग्रामीण भागासह शहरी भागातील लोकांची खाती आहेत. अनेक जणांचे जनधन खाते देखील आहे.

मात्र पैसे काढण्यासाठी बँक खातेधारकांना पैसे काढण्यासाठी तासन् तास ताटकळत उभे राहावे लागत असल्यामुळे खातेधारकांनी नाराजी व्यक्त केली असून, बँकेच्या मनमानी कारभार थांबविण्याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी करंजी येथील सरपंच भय्यासाहेब रोकडे यांनी केली आहे. (bad behaviour with customer in nationalized bank jalgaon news)

शहरात साधारणपणे आठ ते दहा राष्ट्रीयीकृत बँका आहेत. या बँकांमध्ये शहरासह तालुक्यातील हजारो ग्राहकांनी खाते उघडली आहेत. मात्र ग्राहकांचा पैसा त्यांना वेळेवर मिळत नाही. बँकेतील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली तर कर्मचारी नाहीत, बँक शाखा व्यवस्थापक नाहीत, तुम्ही वरिष्ठांशी बोला, अशा पद्धतीने वागणूक मिळत असल्याचे बँक खातेधारकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, बचत व पैशांचे संरक्षण व्हावे, यासाठी नागरिक हा बँकेत खाते उघडतो. मात्र त्यांच्याच पैशाला त्यांना बँकेत ताटकळत उभे राहावे लागत असल्यामुळे हा कोणता न्याय अशी धारणा बँक खातेधारकांची झाली आहे. दरम्यान, एका राष्ट्रीयीकृत बँकेत खातेदारकांनी आपल्याला पैसे मिळावेत, यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना विनंती केली.

मात्र संबंधित कर्मचाऱ्याने खातेधारकांना उलटसुलट उत्तर देत वेळकाढूपणा केला. दरम्यान, अनेक खातेदारकांचे पॅनकार्ड व आधारकार्ड असून, देखील त्यांना बँकेमार्फत योग्य ती रक्कम दिली जात नसल्याचा आरोप सरपंच रोकडे यांनी केला आहे.

दरम्यान, ग्रामीण भागातील तसेच करंजी बुद्रुक येथील बँक खातेधारकांना यापुढे योग्य न्याय न मिळाल्यास संबंधित बँकेची तक्रार वरिष्ठांकडे करून खातेधारकांना न्याय मिळण्यासाठी आपण योग्य तो पाठपुरावा करू, असेही रोकडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT