Railway Accident Jalgaon esakal
जळगाव

Jalgaon News : प्रवासी बोगीच्या Battery boxला आग

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मध्य रेल्वेच्या जळगाव जंक्शन स्थानकावर भुसावळ- देवळाली एक्सप्रेस बोगीच्या बॅटरी बॉक्सला आग लागल्याची घटना बुधवारी (ता. २८) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. यामुळे देवळाली एक्सप्रेस बराच वेळ जळगाव रेल्वेस्थानकावर खोळंबली.

मध्य रेल्वे मार्गावर नाशिककडे जाणारी गाडी क्रमाकं ११११४ भुसावळ- देवळाली एक्सप्रेस जळगाव स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर उभी होती.

त्याच वेळेस आरएमएस ऑफिससमोरील एका बोगीच्या बॅटरी बॉक्समधून धूर येत असल्याचे तीन क्रमाकांवरील फलाटावरील स्वच्छता कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. (Battery box of passenger bogie on fire Jalgaon Railway Station Devlali Express stop jalgaon news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

स्वच्छता कर्मचाऱ्याने तत्काळ आरपीएफ आणि स्टेशन अधीक्षकांना या घटनेची माहिती दिली. या बोगीसह आजूबाजूच्या बोगीतील प्रवाशांना उतरविण्यात येऊन बोगी पूर्णपणे रिकामी करण्यात आली.

दरम्यान, पायलट आणि गार्ड व इतर कर्मचाऱ्यांनी उपलब्ध असलेल्या फायर इस्टिंग्यूशरमधील अग्निप्रतिबंधक रसायनाचा फवारा मारून आग आटोक्यात आणली.बॅटरी बॉक्सच्या बाजूला प्लॅस्टिक वा अन्य कचरा अडकलेला आढळून आला. या कचऱ्यामुळे बॅटरीच्या वायरींनी पेट घेतला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT