bawankule jalgaon daura on 3 july jalgaon news esakal
जळगाव

Bawankule Jalgaon Daura : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा

Bawankule Jalgaon Daura : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांचा उद्या (ता.२) होणारा दौरा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. सोमवार (ता. ३) रोजी ते जळगाव जिल्ह्यात येत आहेत. (bawankule jalgaon daura on 3 july jalgaon news)

‘हर घर मोदी’ या भारतीय जनता पक्षाच्या अभियांनातर्गत प्रत्येक जिल्ह्यात नेत्यांच्या भेटीही आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याच अंतर्गत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबनकुळे हे सोमवार (ता.३) पासून दोन दिवसाच्या जळगाव दौऱ्यावर येत आहेत.

त्याच्या समवेत प्रदेश संघटनमंत्री विजयराव चौधरी तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे रविवार (ता.२) रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार होते, मात्र पक्षाची मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे, त्यामुळे हा दौरा एक दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती महानगरप्रमुख दीपक सूर्यवंशी यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्री. बावनकुळे सोमवार (ता.३) रोजी जामनेर येथे प्रथम येतील. त्या ठिकाणी पक्षाची बैठक होईल. त्यानंतर बोदवड, मुक्ताईनगर येथेही बैठक होईल. सायंकाळी पाच वाजता ते जळगावात येतील. पिंप्राळा येथे त्यांची जाहीर सभा होईल.

यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, प्रदेश संघटनमंत्री विजयराव चौधरी उपस्थित राहतील. श्री. बावनकुळे यांचा मंगळवार (ता.४) रोजी एरंडोल, पारोळा असा दौरा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT