esakal
esakal
जळगाव

Govt Schemes : शासकीय योजनांच्या जत्रेसाठी सज्ज राहा; आमदार किशोर पाटील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पाचोरा व भडगाव तालुक्यात शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमासंदर्भात आढावा बैठक नुकतीच झाली. आमदार किशोर पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ही बैठक झाली. (Be ready for fair of government schemes Instructions to officials in review meeting jalgaon news)

याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, रावसाहेब पाटील, सुनील पाटील, गणेश पाटील, पंढरीनाथ पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व जनजागृतीसाठी शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राज्यभर राबविण्यासंदर्भात आदेशित केले असल्याने त्या संदर्भात आमदार किशोर पाटील यांनी माहिती दिली.

राज्य शासनाच्या वैयक्तिक, सामूहिक विविध लाभार्थी योजना असून, अशिक्षितपणा व कागदपत्रांच्या अभावामुळे अनेक लाभार्थ्यांपर्यंत या शासकीय योजनांची माहिती पोहोचलेली नाही. त्यामुळे त्यांना या योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या योजनांची समाजातील सर्व घटकांना सविस्तर माहिती कळावी व खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवता यावा, यासाठी शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम पाचोरा व भडगाव तालुक्यात राबविण्याचा निर्धार करण्यात आला.

येत्या २० मेपर्यंत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थी योजना व लाभार्थी या संदर्भातील सर्व माहिती संकलित करावी व त्यानंतर शासकीय योजनांची जत्रा उपक्रमाचे आयोजन करावे, असे आमदार किशोर पाटील यांनी सुचित केले.

सर्व विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासंदर्भात निर्धार केला व २० मेपर्यंत सर्व माहिती संकलित करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. ही माहिती २० मेपर्यंत संकलित झाल्यानंतर प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या नियोजनानुसार शासकीय योजनांची जत्रा उपक्रमाची तारीख निश्चित करण्याचे ठरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT