fighting  sakal
जळगाव

हळदीच्या दिवशीच नवरदेवाला मारहाण

भावी पतीला मारहाण करणाऱ्यांविरोधात नववधूने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

भडगाव (जि. जळगाव) : आपल्या जातीच्या मुलीशी लग्न करीत असल्याच्या रागातून देव्हारी-कनाशी (ता. भडगाव) येथील नवरदेवाला हळदीच्या दिवशी जमावाने मारहाण केली. ही घटना रविवारी (ता. ५) घडली. आपल्या भावी पतीला मारहाण करणाऱ्यांविरोधात नववधूने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

देव्हारी-कनाशी येथील समाधान पाटील याचा विवाह आरती ज्ञानेश्वर बोर्डे (वय २०, रा. बोराडी, ता. चिखली, जि. बुलढाणा) यांच्याशी ठरला होता. हा विवाह ६ जूनला देव्हारी-कनाशी येथे होणार असल्याने ५ जूनला समाधान पाटीलला हळद लावली जात होती. त्या दिवशी रात्री नऊच्या सुमारास देव नाचविण्याचा कार्यक्रम सुरू असताना, सुकदेव देवराम सोनवणे, समाधान देवराम सोनवणे, दिलीप रतन गायकवाड (सर्व रा. देव्हारी), रोहिदास लक्ष्मण भिल (रा. बोदर्डे) हे २० ते २५ लोकांच्या जमावासह त्या ठिकाणी आले व ‘समाधान पाटील हा आपल्या जातीच्या मुलीशी विवाह करीत आहे, याला जिवंत सोडू नका’, असे म्हणत सुकदेव सोनवणे याने समाधानच्या हनुवटी व मानेवर कुऱ्हाडीने वार केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तेथे उपस्थित असलेली वऱ्हडी मंडळी त्याला वाचविण्यासाठी आली असता, त्यांनाही जमावाने धमक्या देत घरातील, मंडपातील खुर्च्या अस्ताव्यस्त फेकल्या. याबाबत माहिती कळताच पोलिस घटनास्थळी आले असता, जमावाने पोलिसांशीही हुज्जत घातली. काही जणांनी पोलिसांच्या शासकीय वाहनावर (एमएच १९, सीझेड ८५९७) दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले.

याप्रकरणी नववधू आरती बोर्डे हिने दिलेल्या तक्रारीवरून भडगाव पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयित सुकदेव सोनवणे, समाधान सोनवणे, दिलीप गायकवाड व रोहिदास भिल यांना ताब्यात घेतले. या सर्वांना भडगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ९ तारखेपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT