जळगाव : लस घेणाऱ्यांनाच योजनांचा लाभ; जिल्हाधिकारी राऊत sakal
जळगाव

जळगाव : लस घेणाऱ्यांनाच योजनांचा लाभ; जिल्हाधिकारी राऊत

अमळनेरला लसीकरण शिबिराला भेट

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : दोन दिवसांच्या महालसीकरण शिबिरात सुमारे ४८०० नागरिकांचे घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भेट देऊन विविध ठिकाणी पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी डोस घेतल्याचे प्रमाणपत्र मागवा किंवा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह अहवाल मागवा; अन्यथा लस न घेणाऱ्यांना शासनाच्या लाभार्थी योजनेचे लाभ देऊ नका, अशा सूचना राऊत यांनी भेटीप्रसंगी अधिकाऱ्यांना दिल्या.

तालुक्यात शुक्रवार (ता. १०) व शनिवार (ता. ११) असे दोन दिवस महालसीकरण शिबिर घेण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी राऊत, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, डॉ. राजेंद्र शेलकर, संजय चौधरी यांच्यासह नगरसेवक, समाजसेवक यांनी गल्लोगल्ली फिरून नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

शहरातील शाहआलमनगर, जिनगर गल्ली, गांधलीपुरा, इस्लामपुरा, कसाली मोहल्ला यासह काही भागात नागरिकांनी प्रखर विरोध केला, तर काही ठिकाणी टाळाटाळ केली, नकार दिला. जिल्हाधिकारी राऊत यांनी लस न घेणाऱ्या नागरिकांना रेशन धान्य, पेट्रोल आदी बाबी देऊ नका, प्रत्येक ठिकाणी डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा ४८ तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल मागवा, असे आदेश दिले.

प्रत्येक प्रभागातील पथकात एक परिचारिका, दोन आशा स्वयंसेविका, एक वसुली कर्मचारी, एक मुकादम व प्रभागातील सफाई कर्मचारी असे पथक लसीकरणासाठी परिश्रम घेत होते. दुकानदारांना त्यांच्या दुकानावर जाऊन लस देण्यात आली. त्याचप्रमाणे बाहेरगावाहून आलेले मजूर, स्थलांतरित लोक यांना झोपडीत, रस्त्यावर लस देण्यात आली. पहिल्या दिवशी सकाळ व दुपारच्या सत्रात ८१८ नागरिकांना पहिला डोस, १ हजार ५४६ नागरिकांना दुसरा डोस असा एकूण २ हजार ३६४ लोकांना तर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात ३८१ लोकांना पहिला डोस, ६३४ लोकांना दुसरा डोस असे १ हजार १५ डोस व दुपारचे सत्र मिळून दोन्ही दिवसाचे सुमारे ४ हजार ८०० नागरिकांना लसीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT