BJP Agitation  esakal
जळगाव

BJP Agitation : तूप लोणीचोरी तरीही उलट्या बोंबा!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ‘दही, दूध चोरून खातंय कोण? तूप, लोणी चोरून खातंय कोण? आहेत की नाही चोराच्या उलट्या बोंबा’ अशा घोषणांचे फलक हाती घेऊन भारतीय जनता पक्षातर्फे शहर पोलिस ठाण्यात आंदोलन करण्यात आले व जिल्हा दूध संघात लोणी व दूध भुकटी गैरव्यवहार प्रकरणी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.

भारतीय जनता पक्ष महानगरतर्फे शुक्रवारी (ता. १४) आंदोलन करण्यात आले. भाजप कार्यालयापासून घोषणा देत व हाती फलक घेऊन कार्यकर्ते शहर पोलीलिस ठाण्याला पोचले. त्यांनी या ठिकाणीही फलक फडकवीत घोषणा दिल्या. (Bharatiya Janata Party Mahanagar organized protest on Friday Jalgaon Political News)

त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेऊन त्यांना गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. याबाबत त्यांनी निवेदनही दिले. या वेळी जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजप जिल्हा चिटणीस डॉ. राधेश्‍याम चौधरी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, अरविंद देशुमख, राजेंद्र घुगे पाटील आदी उपस्थित होते

याबाबत बोलताना महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी म्हणाले, की चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शहर पोलिस ठाण्याला जिल्हा दूध संघातील लोणी व दूध भुकटी अपहार प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, मात्र त्यावर पोलिसांनी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही. गुरुवारी (ता. १३) जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे व आम्ही कार्यकर्त्यांनी शहर पोलिस ठाण्याला अधिकाऱ्यांना भेटून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तेव्हा दोन दिवसांत चौकशी करून आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर आम्हाला असे लक्षात आले, की विरोधी पक्षाचे लोक पोलिसांवर दबाव टाकून या प्रकरणी अफरातफर करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.

त्यामुळे आम्ही पुन्हा आज जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेऊन आगामी काळात दिवाळीचा सण आहे, त्यामुळे कोणतेही वातावरण तापू नये यासाठी ताबडतोब गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक करण्यात यावी, अशी आम्ही मागणी केली. पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये, अशी मागणीही आम्ही पोलिसांना केली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आंदोलकांची भेट घेऊन या प्रकरणी चौकशी सुरू आहे. ती झाल्यानंतर गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT