uddhav thackeray
uddhav thackeray esakal
जळगाव

Jalgaon News : उद्धव ठाकरे आज जळगाव जिल्ह्यात; पिंप्राळ्यात शिवस्मारक जागेचे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) रविवारी (ता. २३) जळगाव जिल्ह्यावर येत आहेत. (Bhoomi Pujan of Chhatrapati Shivaji Maharaj statue place to be constructed in Pimprala area will be done by uddhav thackeray jalgaon news)

जळगाव येथील पिंप्राळा भागात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जागेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे, तर पाचोरा येथे भव्य जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे सोमवारी (ता. २३) मुंबई येथून विमानाने जळगाव विमानतळावर सकाळी अकराला येणार आहेत. त्यानंतर मोटारीने ते पाचोरा येथे रवाना होतील.

त्याअगोदर सकाळी साडेअकराला जळगावातील पिंप्राळा येथे महापालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ते पाचोरा येथे रवाना होतील. पाचोरा येथे जाहीर सभा व माजी आमदार (कै.) आर. ओ. तात्या पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पिंप्राळ्यात जोरदार तयारी

पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त पिंप्राळा येथे कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही तयारी सुरू आहे.

या ठिकाणी व्यासपीठही उभारण्यात आले आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी पिंप्राळा येथे कार्यक्रमास्थळी भेट देत पाहणी केली. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

पाचोरा येथे सभास्थळाची पाहणी

पाचोरा येथील भडगाव रस्त्यावरील सा. वा. मैदानावर सायंकाळी साडेसहाला सभा होईल. या ठिकाणी सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभास्थळाची पाहणीही खासदार संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT