Court Sakal
जळगाव

BHR Bank Fraud : उच्च न्यायालयाने कंडारेंचा जामीन फेटाळला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बीएचआर पतसंस्थेत अवसायक नियुक्त झाल्यानंतर झालेल्या कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील खटल्यात अवसायक जितेंद्र कंडारे यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.

भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात, बीएचआर या मल्टिस्टेट पतसंस्थेतील कोट्यवधींचा गैरव्यवहार राज्यभर गाजला. पतसंस्थेत जमा ठेवीदारांची जवळपास दोन हजार कोटींवर रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्थेचे संचालक, अधिकाऱ्यांविरुद्ध राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

या गुन्ह्यात कामकाज

पतसंस्थेवर अवसायक नियुक्त झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराची प्रकरणे समोर आली. त्यात पुणे ग्रामीणच्या शिक्रापूर पोलिस ठाण्यात संतोष काशीनाथ इंगळे (पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अवसायक जितेंद्र गुलाबराव कंडारे यांच्यासह अन्य संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात फसवणुकीची रक्कम चार कोटी ५४ लाख ७१ हजार ५१६ एवढी आहे. याच संदर्भातील गुन्ह्यात गुरुवारी (ता. १) मुंबई उच्च न्यायालयात कंडारेंच्या जामीन अर्जावर कामकाज झाले.

हेही वाचा: वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

अन्य गुन्ह्यांमध्ये कंडारेंना जामीन मिळाल्याचा युक्तिवाद करत त्यांचे वकील ॲड. यश सोनवणे यांनी या गुन्ह्यातील रक्कम कमी असल्याचे सांगत जामीन मंजूर करण्याची विनंती केली. मात्र, ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या जागी नियुक्ती झालेले विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांनी कंडारे सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे अवसायक म्हणून त्यांची पतसंस्थेतील ठेवींचे संरक्षण करण्याची जबाबदारी अधिक होती. त्यामुळे रक्कम कमी म्हणून कंडारेंना जामीन मंजूर करता येणार नाही, असा युक्तिवाद केला. दोन दिवसांच्या कामकाजानंतर न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी कंडारेंचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samarjeet Ghatge: समरजीत घाटगे पुन्हा भाजपमध्ये जाणार! तारीखही आली; स्वतःच सांगितलं घरवापसीचं कारण

IPL 2026 : रोहित शर्माला झटका... मुंबई इंडियन्सची हार होताच, समोर आली मोठी बातमी; समीर रिझवी ठरला कारणीभूत

GT vs RR Live : गुजरात टायटन्सचे नेतृत्व राशीद खान याच्याकडे; शुभमन गिल याला नेमकं काय झालं? IPL 2026 मध्ये मोठा ट्विस्ट

सीईटी परीक्षेत संतापजनक प्रकार, पेपरात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, कारवाईची मागणी

Horoscope News : 'या' तारखेपासून शनीदेव बदलणार 5 राशींचं नशीब ! शंकराची होणार कृपा, भाग्योदयाची सुरुवात

SCROLL FOR NEXT