Jalgaon Market Committee election esakal
जळगाव

Jalgaon Bazar Samiti Result : भुसावळला भाजपचे वर्चस्व; ‘मविआ’ला केवळ 3 जागा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील बाजार समिती निवडणुकीचा निकाल शनिवारी (ता. २९) जाहीर झाला. यात भाजप आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली. (Bhusawal Bazar Samiti Result BJP won election jalgaon news)

दुसरीकडे आमदार एकनाथ खडसे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकार पॅनलला केवळ तीन जागांवर यश मिळाले आहे.

भुसावळ बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतमोजणीला सकाळी दहाला सुरुवात झाली. भुसावळ बाजार समितीत भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे शेतकरी सहकार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दीड तासांतच याठिकाणची मतमोजणी संपली आहे. यामध्ये १८ पैकी जागांवर १५ जागांवर भाजप शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे शेतकरी सहकारी पॅनलचे उमेदवार केवळ तीन जागांवर विजयी झाले आहेत.

भुसावळ बाजार समितीत या आधी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. दरम्यान, महाविकास आघाडीच्या पॅनलचे नेतृत्व भुसावळ बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी तसेच एकनाथ खडसे करत होते. त्यांना आमदार सावकारे यांनी कडवी झुंज दिली. यात मविआच्या पॅनलचा धुव्वा उडाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

मोठी बातमी : भारत-बांगलादेश मालिका स्थगित; रोहित शर्मा, विराट कोहली यांना ऑक्टोबरपर्यंत मिळाली सुट्टी

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

SCROLL FOR NEXT