esakal
जळगाव

Jalgaon Crime News : भुसावळ पोलिसांनी पकडला लाखोंचा गुटखा; ट्रक ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित ट्रकची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळून आला.

इंदूर येथील ट्रान्स्पोर्ट कंपनीचा हा ट्रक असून, त्यात असलेला गुटखा भुसावळ शहरात विक्रीसाठी आणला असल्याची माहिती समोर आली आहे. (Bhusawal police caught Gutkha worth lakhs jalgaon crime news)

पोलिसांनी ट्रक जप्त केला असून, वाहनासह सुमारे साठ लाखांचा गुटखा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

इंदूर ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या एका ट्रकमधून गुटखा आणला जात असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी ट्रक ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये, पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोलिस कर्मचारी सुनील जोशी, विजय नेरकर, उमाकांत पाटील, नीलेश चौधरी, रमण सुरडकर, यासीन पिंजारी, सचिन चौधरी, जावेद शहा, योगेश माळी, प्रशांत सोनार, प्रशांत परदेशी, भरत बाविस्कर यांच्या पथकाने संशयित ट्रक अडवला.

चौकशी केली असता इंदूर येथील लॉजिस्टिक ट्रान्स्पोर्ट कंपनीचा ट्रक (क्रमांक यूपी ७८, सीए ५६९८) विविध वस्तू घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे जात असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या कंटेनरची तपासणी केली असता यामध्ये ‘राजनिवास’ गुटखा पोलिसांना वाहतूक होताना मिळून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT