railway  esakal
जळगाव

Bhusawal Railway : भुसावळ रेल्वेला एप्रिलमध्ये 138 कोटींचे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भुसावळ रेल्वे विभागाला एप्रिल महिन्यात १३८ कोटी ६ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती भुसावळ विभागीय रेल्वे प्रंबधक एस. एस. केडिया व वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक डॉ. शिवराज मानसपुरे यांनी दिली. (Bhusawal Railway earned an income of 138 crores in April jalgaon news)

मेल एक्सप्रेस कोचिंग उत्पन्न ६६ कोटी ३७ लाख एवढे मिळाले आहे. माल गुदामद्वारे उत्पन्न ६१ कोटी ५९ लाखांचा महसूल मिळाला. तिकीट तपासणीद्वारे ७ कोटी सहा लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

‘युटीएस’ मोबाइल ॲपबाबत भुसावळ विभागात २५ ठिकाणी आणि पाच मेमू गाड्यांमध्ये माहिती देण्यात आली. एकूण तीन हजार ८११ प्रवाशांनी हे ॲप डाऊनलोड केले.

१७ एप्रिलला माहेजी आणि श्री क्षेत्र नागझरी रेल्वेस्थानकावर यूटीएस तिकीट वितरणासाठी दोन तिकीट बुकिंग एजंटची नेमणूक करण्यात आली. अमरावती येथील बॉक्स स्पोर्ट्स क्लबसाठी पाच वर्षांसाठी परवाना शुल्क ५ लाख ११ हजारांचा ठेका प्रतिवर्ष देण्यात आला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

डीआरएम कार्यालयात फोटोकॉपिअर सेंटर आणि विविध स्टोअर सुरू करण्यासाठी पाच वर्षांसाठी एलओए जारी केले आहे. पंचवटी एक्स्प्रेस (मनमाड-मुंबई सीएसटी-मनमाड) वर विनाइल रॅपिंगचे कंत्राट तीन वर्षांसाठी देण्यात आले.

१० लाख प्रतिवर्ष रेल्वेला परवाना शुल्क मिळणार आहे. पार्किंग कंत्राट (२ व्हीलर) भुसावळ स्थानक (दक्षिण बाजू) येथे ई-लिलावाद्वारे तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला आहे. त्यातून रेल्वेला ५८ लाखांचे उत्पन्न प्रतिवर्ष मिळेल.

अकोला स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर एक एस्केलेटर बसविण्यात आले. चाळीसगाव स्थानकावर एक एफओबी करण्यात आला असून, प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे. जळगाव स्थानकावर उच्च श्रेणीतील वेटिंग रूमचे नूतनीकरण करण्यात आले.

खंडवा-३, भुसावळ-१, बडनेरा-३, मलकापूर-१, बुऱ्हाणपूर-१, अकोला-३, जळगाव-१ आणि मूर्तिजापूर-१ येथे तात्पुरते पाणी बूथ उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

२५ एप्रिलला सर्व स्थानक तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली विशेष तिकीट तपासणी मोहीम घेण्यात आली. १ हजार ६१९ प्रकरणांमधून ११ लाख ११ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT