thief esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चाळीसगावात भामट्यांनी पळविली दुचाकीवरील 3 लाखांची पिशवी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथे दुचाकीस्वाराचे लक्ष विचलीत करून त्याच्या गाडीला मागील बाजूला लावलेली तीन लाख रुपयांची प्लास्टिकची पिशवी अलगदपणे काढून पोबारा केला. ही घटना शहरातील स्टेशन रोडवरील बँक ऑफ बडोदा शाखेसमोर शनिवारी (ता. ७) दुपारी दीडच्या सुमारास घडली.( bike rider thief 3 lakh from bike jalgaon crime news)

ओझर (ता. चाळीसगाव) येथील राजेंद्र तान्हीराम वाणी (वय ५७) यांनी चाळीसगावातील स्टेशन रोडवरील बँक ऑफ बडोदा शाखेतून तीन लाखांची रक्कम काढून हे पैसे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून दुचाकीच्या मागे लावून ते घराकडे निघाले होत.

मात्र, दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी वाणी यांचे लक्ष विचलीत करून मागे लावलेली तीन लाखांची पिशवी लंपास केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे भामटे परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, पोलिसांनी या फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

याबाबत माहिती असल्यास शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी, पोलिस कर्मचारी योगेश बेलदार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या चार महिन्यातील ही तिसरी घटना आहे.

यापूर्वी शहरातील स्टेट बँकेसमोर, तसेच सेंट्रल बँकेसमोर ठेवीदारांचे दुचाकीच्या डिक्कीतून पैसे चोरीला गेल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. शहरातील या दोन घटना ताज्या असताना शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ओझर गावातील रहिवाशांसंदर्भात घटना घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT