Girl suicide
Girl suicide esakal
जळगाव

लग्नाचे वचन देणाऱ्या प्रियकरा कडून ब्लॅकमेलींग; तरुणीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : प्रेमाला कुठलीही जात-धर्म पंत नसतो, असे म्हणतात. मात्र, एकाच जातीत तरुण-तरुणीचे प्रेम फुलले. मुलाने लग्नाचे वचन दिल्याने हो म्हणणाऱ्या तरुणीचा मात्र त्याच मुलाने इतका छळ केला, की तिने अखेर मृत्यूला कवटाळले.

प्रेमाचे खोटे नाटक करून फसवणूक, ब्लॅकमेल करणाऱ्या मुलाने स्वतःही लग्न केले नाही, दुसऱ्याशीही होऊ देत नाही, मुलाची आई नको ते लांछन लावते. या वेदना असह्य झाल्याने अखेर पीडितेने गळफास घेतला. मृत्यूशी १८ दिवस झुंज देत दिव्याने बुधवारी (ता. १३) मृत्यूला कवटाळले.

मृत तरुणीच्या मोठ्या वडिलांनी (काका) जिल्‍हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की तारखेडा (ता. पाचोरा) येथील दिव्या दिलीप जाधव (वय २१) आई-वडिलांसह गावात वास्तव्याला होती. आई-वडील हातीमजुरी करून उदरनिर्वाह करतात. गावातील नीलेश मंगलसिंग गायकवाड याने दिव्याशी मुद्दाम ओळख केली. नीलेशने लग्नाचे आमिष दाखवून दिव्याचा प्रेमासाठी होकार मिळविला.

अन्यत्र विवाहाचा निर्णय

यादरम्यान दिव्याच्या आई-वडिलांनी तिचा विवाह करण्याचा निर्णय घेतल्याने मी लग्न करणार आहे, असे,सांगत नीलेश नेहमीच आडकाठी आणत होता. मुलीच्या आवडीला प्राधान्य देत सामान्य कुटुंबातील जाधव कुटुंबाने थेट नीलेश गायकवाड यांच्या घरी जाऊन लग्नाबाबत मागणी घातली. मात्र, मुलाच्या आईने स्पष्ट शब्दात नकार देत त्यांना पिटाळून लावले. त्यानंतर पुन्हा त्यांनी दिव्यासाठी स्थळ शोधमोहीम राबवून एका ठिकाणी बोलणी पक्की केली होती. मात्र, तेही त्याने जमू दिले नाही.

माझा मुलगा चार लफडे करेल...

दिव्या आणि नीलेशच्या प्रकरणात समाजातील ज्येष्ठ मंडळी आणि पंचांनी मध्यस्थी करून समजावण्याचा प्रयत्न केला. नीलेशच्या आई-वडिलांना लग्नासाठी होकार देण्यास सांगितल्यावर त्याच्या आईने मात्र ‘माझा नवरा रेल्वेत नोकरीला, शेती, चार प्लॉट इतकी संपत्ती आहे. त्या मुलीचा बाप भिकारी. काय आहे त्याच्याकडे. माझा मुलगा चार लफडे करेल. तुमच्या मुलीला आवरा’, असे म्हणत पिटाळून लावले.

ब्लॅकमेलिंग अन्‌ आत्महत्या

दिव्याचे लग्न दुसरीकडे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कळताच नीलेशने त्याचे दिव्यासोबतचे फोटो, कॉल रेकॉडिंग आणि चॅटिंग त्या मुलाच्या कुटुंबीयांना पाठविण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरू केले होते. वारंवार समजूत काढून विनवण्या करूनही तो थांबत नव्हता. उलटसुलट व्हॅाट्‌सॲप चॅटिंगसह त्याचा त्रास, शिवीगाळ, दमदाटी वाढल्याने दिव्याने त्रास असह्य झाल्याने २४ जूनला दुपारी आई-वडील शेतात असताना गळफास घेतला. नातेवाइकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने तिला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. सलग १८ दिवस मृत्यूशी झुंज देत अखेरीस बुधवारी (ता. १३) दिव्याची प्राणज्योत मालवली.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

दिव्याचा मृत्यू झाल्यावर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. आई-वडील दोघांनाही तिच्या मृत्यूचा धक्का बसल्याने त्याची वाचाच गेली. घडल्या प्रकाराने संतप्त तरुणांनी संबंधित तरुणाला त्याच्या आईसह अटक करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्धार केला. परिस्थिती चिघळू नये, यासाठी पोलिसांनी तातडीने पावले उचलत नीलेश गायकवाडला ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना केले. मात्र, दोघे मायलेक मिळून आले नाहीत. अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाइकांनी दिव्याचा मृतदेह ताब्यात घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT